फेमस

Mumbai Indians : दुबईतही मुंबई इंडियन्सच्या पाठीशी गणपत्ती बप्पा, फोटो व्हायरल…

IPL च्या तेराव्या हंगामात मुंबईने सुरुवातीपासूनचं आपली बाजू राखून ठेवली आहे. प्रत्येक सामन्यात धडाडीची कामगिरी करत मुंबई इंडियन्सने क्वालिफायर 1 मध्ये आपलं पहिलं स्थान पक्क केलं होतं. त्यानंतर पाठोपाठ आलेल्या दिल्ली कॅपिटल्सला हारवून मुंबईने फायनलमध्ये मजल मारली होती. या सगळ्या यशामध्ये मुंबईच्या खेळाडूंनी घेतलेली मेहनतही कारणीभूत आहेच, त्याबरोबर अजून एक कारण आता समोर आलं आहे.

सध्या मुंबई इंडियन्सच्या संघाचा डगआऊटमधील एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. सपोर्ट स्टाफच्या टेबरवर गणपती बप्पाची फ्रेम असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही या फोटोने चांगलीच धूम माजवली आहे. अनेकांच्या स्टेटसवर हा फोटो हमखास झळकत आहे.

मुंबई इंडियन्सच्या मालकीन निता अंबानी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब गणपतीची मनोभावे पूजा करताना आपण अनेका पाहिलं असेल. गणपतीवर श्रद्धा असलेल्या निता अंबानी यांच्या घरामध्येदेखील गणपतीची मोठी मुर्ती आहे. कदाचित याच कारणाने श्रद्धेच्या कारणाने आपल्या संघाच्या डगआऊटमध्येही गणपतीची मुर्ती ठेवण्याचं त्या सांगत असाव्यात, अशाच काहीशा समिश्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

हा फोटो आहे दिल्ली विरुद्ध रंगलेल्या क्वालिफायर १ या सामन्यातला. या सामन्याचा विचार केल्यास मुंबईच्या खेळाडूंनी एकदम दमदार कामगिरी केली आहे. फलंदाजीत क्विंटन डी-कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि हार्दिक पांड्या तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी संघाला हवी तसी चमक दाखवली आहे, त्यामुळे या सामन्यासह हा व्हायरल होणारा फोटोही चाहत्यांना भूरळ घालत आहे, हे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments