आपलं शहर

सरसकट मुंबई लोकल सुरू होईल, पण “या” लोकांना मिळणार का परवानगी ?

 

“कृपया गाडीचे पायदान आणि फलाटावरील अंतरावर लक्ष द्या” हे ऐकण्यासाठी मुंबईकरांचे कान आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि मुंबईकरांची लोकल प्रवासाची गेल्या सात महिन्यांपासूनची प्रतीक्षा लवकरचं संपणार आहे. आता कोरोना संकट मुठीत येऊ लागले असताना सरकार सरसकट मुंबईकरांना लोकल प्रवासास मुभा देणार असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारने रेल्वेला पाठवला आहे. यामध्ये दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वांसाठी प्रवासाची मुभा देण्याची मागणी करण्यात आली आहेे. यावर लाेकलमधील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत ते सादर करा अशी अट राज्य सरकारला घातली. यावर राज्य सरकारकडून मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी ॲपचे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

आता मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहता रिकव्हरी रेट हा 93 टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. तरीही संसर्ग वाढू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे, त्यामुळे सर्वसामान्यांकरिता लाेकल प्रवास सुरू करतानाच सुरक्षेच्या अनेक गाेष्टींचा विचार राज्य सरकार कडून करण्यात येत आहेे. प्रवाशांच्या गर्दीचा विचार करता सरकार एक ॲप तयार करीत आहे. प्रवासी संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कलर कोडिंगवर काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी होणार नाही. प्रवाशांना कलर कोडिंग आणि ठरावीक वेळेचे तिकीट देण्यात येईल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

नक्कीच, राज्यसरकारच्या या सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल आहे परंतु, यामध्ये कित्येक जणांकडे साधे मोबाइल नाहीत तर काहींकडे ॲण्ड्रॉइड माेबाइल तसेच इंटरनेट सुविधा नसेल मग अश्या प्रवाशांचे काय, असा सवाल येथे उपस्थित होतो. कारण, लोकल मधून प्रवास करणारे हे फक्त अधिकारी वर्गातील नसून, घरकाम तसेच माथाडी कामगार देखील आहेत. मग त्यांच्याकडे ॲण्ड्रॉइड माेबाइल नसतील तर त्यांनी प्रवास करू नये का ? असा खोचक अन्याय का त्यांच्यवर ? असे अनेक प्रश्न येथे उपस्थित होत असताना यावर सरकार काय तोडगा काढेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments