कारण

मुंबई पोलिसांनीच सांगितला आपला आणि अमेरिकेच्या निवडणुकीचा थेट संबंध…

अमेरिकेची अध्यक्षीय निवडणुकी सध्या चांगलीच रंगली आहे. भारतातदेखील त्याचे काहीसे पडसाद उमडलेले पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी त्यावर बोलण्यास सुरुवात केली आहे. अनेक देशाचं अर्थकारण थेट अमेरिकेशी जोडलेलं असल्याने आणि एका महासत्ता देशाची ही निवडणूक असल्याने जगाच्या दृष्टीनेदेखील ही निवडणूक खूप महत्वाची माणली जाते. अशातच मुंबई पोलिसांनीदेखील या निवणुकीला महत्व दिलं आहे.

सध्या मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलची चर्चा सगळीकडे होत आहे. कारण मुंबई पोलिसांनी आपल्या सुरक्षेचा थेट अमेरिकेच्या निवडणुकीतील मतदानाशी जोडलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यात अमेरिकेतील सत्ता संघर्ष पेटला आहे. त्यातच आता मुंबई पोलिसांनी त्यावर विधान करण्याची संधी सोडली नाही.

मधल्या काही दिवसात मुंबई पोलिसांचा इमर्जंसी संपर्क 100 हा क्रमांक बदलणार असल्याच्या माहिती पसरत होती. त्यावर आता मुंबई पोलिसांनी अमेरिकेच्या मतदान मोजणीचा आधार घेत आपल्या संपर्क क्रमांकाविषयी माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांचा इमर्जंसी संपर्क क्रमांकाचे महत्व सांगण्यासाठी हे ट्विट केलं असल्याचंही नंतर सरळ सरळ स्पष्ट झालं आहे.

मुंबई पोलिसांच्या मते अमेरिकेत डोनाल्ट ट्रम्प यांना 214, ज्यो बायडेन यांना 264 आणि मुंबई पोलिसांना 100 हे नंबर कधीच बदणार नाहीत, असं उदाहरण स्पष्ट केलं आहे. गेले 2 दिवस अमेरिकेतील मतमोजणी काहीशी याप्रमाणेच स्थिर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोल मते, ज्यो बायडेन यांना 264 इलेक्ट्रोल मते स्थिर आहेत. त्यामुळे एका राज्यातील फेर मतमोजणी होण्याचे संकेत अमेरिकेत आहेत. मात्र मुंबई पोलिसांना 100 क्रमांक कधीच बदलणार नाही, हे या ट्विटवरून स्पष्ट झालं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments