आपलं शहर

आता मुंबईकरंच वाचवणार मुंबईकरांचा जीव, पालिकेचं नवं मॅनेजमेंट

 

जागतिक पातळीवर दर्जा राखून ठेवणाऱ्या मुंबई शहरात अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडत असतात. अनेक इमारती, घरे कोसळणे, आगी लागणे, मॉलमधील अनेक दुकाने जळणे अशा अनेक घटना दरवर्षी घडत असतात, त्यात शेकडो लोकांचे बळी जातात. यावप उपाय म्हणून हजार्ड मॅपिंगचं नव मॅनेजमेंट पालिकेने आणलं आहे.

पालिकेकडून दुर्घटना घडण्याची ठिकाणी किंवा मुंबई आग लागू शकते अशा ठिकाणांचे हजार्ड मॅपिंग होणार आहे. हजार्ड मॅपिंग म्हणजेच सर्व्हे होणार आहे. तसेच अशा विभागांमधील नागरिकांना इतर लोकांचा जीव कसा वाचवता येईल, याबाबतचे प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुंबईत कोसळणाऱ्या बहुतेक इमारती या धोकादायक झालेल्या असतात. अशा इमारतींचा सर्व्हे करण्याचे आदेश पालिकेच्या 24 विभाग कार्यालयांना देण्यात आलेत. ज्या ठिकाणी आग लागण्याची किंवा इमारती कोसळण्याची शक्यता आहे त्याची यादी करावी, त्याचा एक अहवाल बनवून पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयात जतन केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात त्याठिकाणी दुर्घटना घडल्यास त्याविभागाची संपूर्ण माहिती पालिकेकडे आणि अग्निशमन दलाकडे असणार आहे. सोबतच कोणत्याही प्रकारची मदत पुरवण्यास पालिका सक्षम असणार आहे.

2012 ते 2018 दरम्यान मुंबईमध्ये

मुंबईत 29 हजार 140 आगीच्या घटना

घटनेत एकूण 300 लोकांचा मृत्यू

एकूण 925 लोक जखमी

एकूण 120 अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी जखमी

जानेवारी ते डिसेंबर 2018
एकूण 4899 आगीच्या दुर्घटना
151 गगनचुंबी इमारतींना आग
386 व्यासायिक दुकानांना आग
969 रहिवाशी इमारतींना आग
544 झोपडपाट्यांमध्ये आग
2849 अन्य ठिकाणी आगीच्या घटना
3195 आगी लागण्याचे कारण शोर्टसर्किट
111 आग गैस सिलिंडर लिकेजमुळे
1593 आगी अन्य कारणामुळे
2018 मधल्या आगीच्या घटनांमध्ये 52 लोकांचा मृत्यू (36 पुरुष, 11 स्त्री, 5 बालकांचा समावेश)

बाईट , सुरेश काकाणी , अतिरिक्त आयुक्त

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments