आपलं शहर

मुंबई लोकलने घेतला मोठा निर्णय, महिलांनी लहान मुलांना स्टेशनवर नेल्यास…

भर लॉकडाऊनमध्येही मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी महिलांना परवानगी देण्यात आली. जेणेकरून कामावर जाणाऱ्या महिलांना सोईस्कर होईल. मात्र या अजून एक धक्कादायक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे अनेक महिला आपल्या लहानमुलांसोबत प्रवास करताना पाहायला मिळाल्या. याच कारणामुळे लोकलमध्ये केवळ महिलांना प्रवासाची परवानगी दिली आहे, त्यांच्या सोबत लहान मुलांना नाही, अशा शब्दात खडसावले आहे.

मिशन बिगन अगेनच्या अंतर्गत महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. कामाच्या वेळा बदलून महिलांना सकाळी 11 ते संध्याकाळी 3 आणि संध्याकाळी 7 ते रात्री 12 या दरम्यान प्रवास करण्याची परवानगी दिली होती. मात्र याच दरम्यान अनेक महिला आपल्या लहान मुलांना घेऊन लोकलचा प्रवास करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे मुंबई लोकलने हा निर्णय घेतला आहे.

इथूनपुढे मुंबईतल्या प्रत्येक स्थानकावर आरसीएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. त्यानुसार ज्या महिलांसोबत लहान मुलं असतील त्या महिलांना स्थानकावर परवानगी नाकाण्यात येईल.

22 मार्चपासून बंद असलेली लोकल सुरुवातीला अत्यावश्यक सुविधेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आली होती, त्यानंतर 17 ऑक्टोबरपासून सर्वसामान्य महिलांसाठी प्रवासाची मुभा देण्यात आली. सकाळी 11 ते संध्याकाळी 3 आणि संध्याकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत ही लोकल सेवा पुरवण्यात येणार आहे.

(Railways has reiterated that ladies are barred from carrying their children in Mumbai local trains. The decision was once again announced after it was found that a large number of women passengers were seen travelling with their children in the local trains.)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments