आपलं शहर

शरद पवारांना खडसेंबाबत फोन केला होता, पण त्यांनी माझं ऐकलं नाही, अंजली दमानिया

 

गेला एक हफ्ता राजकारणात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांकडून त्यांची नावे राज्यपालांकडे सोमवारी (2 नोव्हेंबर) रोजी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुपूर्त करणार आहेत. पण राज्यपाल नियुक्तीसाठी आमदारांची नावे राज्यपालांकडे पोहचण्या अगोदर त्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची काल (1 नोव्हेंबर) रोजी भेट घेतली व या भेटीमध्ये सरळ सरळ नुकतेच राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करू नये असे निवेदन अपील लेटर दिले आहे.

भाजप सत्तेत असताना आणि आता नसताना मला वारंवार डावलले जात असल्याची टीका एकनाथ खडसे मांडत असत. माध्यमांतून आपल्यावर अन्याय झाल्याचे भाष्य ते नेहमी करत असत. एकनाथ खडसेंमुळे भाजप मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आणि त्यावरून भाजपा मध्ये विरोधाभास होऊ लागला. आणि अखेर खडसेंवर झालेल्या अन्यायाला स्वतः वाचा फोडत त्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादी मध्ये येताच अंजना दमानिया यांनी पहिला थेट टीकेचा वार खडसेंवर केला.

सामाजिक कार्यकरीत्या अंजना दमानिया या राजकारणात नसून खडसेंवर वारंवार टीका करत असत. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असणाऱ्या खडसेंना राज्यपाल नियुक्त आमदार बनवू नका यासाठी त्यांनी थेट राजभवणावर दरवाजा ठोठावला. राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करताना त्यांनी वापरलेली भाषा तसेच त्यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करू नये असे निवेदन केले. खडसे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करण्यापूर्वी मी शरद पवारांना खडसेंबाबत फोन केला होता, पण त्यांनी माझं ऐकलं नाही व खडसे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, अंजली यांच्या विरोधात टीव्ही चॅनल वर खडसे यांनी बदनामी केली होती यावर त्यांनी अधिकृत कारवाई करत त्यांच्या विरोधात वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे देखील त्या म्हणाल्या.

तसेच महत्वाचे लागणारे सर्व पुरावे मी दिले असून अधिकचे पुरावे लवकरच देणार आहे. याचबरोबर या प्रकरणाला धरून माझी न्यायलयीन लढाई देखील सुरू राहणार असल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments