आपलं शहर

सिद्धिविनायक मंदिर सर्वांसाठी खुले पण हे आहेत नियम…

 

तब्बल 7 ते 8 महिन्याच्या प्रदिर्घ काळानंतर अखेर राज्यात उद्यापासून नियम अटीवर धार्मिक स्थळ सुरू होणार आहेत. धार्मिक स्थळ सुरू होण्यासाठी भाजप, वंचित बहुजन आघाडी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मैदानात उतरली होती अखेर उद्यापासून मंदिर सूरु होत असल्याने बया राजकीय पक्षानी श्रेय घेण्याचे बाकी विसरले नाहीत. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या समोर देखील भाजपणे वेळोवेळी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. उद्यापासून राज्यातील सरसकट मंदिर सुरू होत असून सिद्धिविनायक मंदिरात देखील उद्याची लगबग सुरू झाली आहे. उद्यापासून सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सिद्धिविनायकाच दर्शन घेता येणार असून त्यासाठी सिद्धिविनायक टेम्पल अँप डाउनलोड करावं लागणार आहे.

भाविकांना दर्शन देण्यासाठी संपूर्ण मंदिर प्रशासन तयार असून भाविकांनी देखील आम्हाला सहकार्य करावे अजून कोरोना गेला नसून दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना केवळ दिवसातून 1000 भक्तांना अँपच्या रजिस्ट्रेशनद्वारे दर्शन दिले जाणार आहे ज्येष्ठ नागरिकांनी आणि लहान मुलांनी ऑनलाइन दर्शन घ्यावे. – आदेश बांदेकर, अध्यक्ष सिद्धिविनायक ट्रस्ट

सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी हे आहेत नियम…

● महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय दिल्या प्रमाणे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट संपूर्ण सज्ज आहे, परंतु त्यासाठी सर्व नियम पाळावे लागणार आहेत.

● प्रत्येक भाविकाला सिद्धिविनायक टेम्पल हा app डाउनलोड करून त्या द्वारे संपूर्ण माहिती यावर भरावी लागणार आहे

● त्यासाठी प्रत्येक भाविकाला सिद्धिविनायक टेम्पलअँपद्वारे वेळ नियोजित करावी लागेल. त्यावेळेनुसार मंदिरात जायच्या अगोदर क्यूआर कोड स्कॅन केला जाईल. क्यूआर कोड स्कॅन झाला तरच आतमध्ये प्रवेश दिला जाईल

● प्रत्येक नागरिकांमध्ये 6 फुटांचे अंतर सक्तीचे असेल

● ज्यांच्याकडे मोबाईल नसेल त्यांच्यास काउंटरवर विशेष सुविधा असेल

● सकाळी 7 ते 9 पर्यंत मंदीर खुले असेल परंतु दुपारच्या आरतीला 12 ते 1 व सायंकाळच्या आरतीला 7 वाजता मंदिर भाविकांसाठी बंद असेल.

● प्रत्येक व्यक्तीला मास्क सक्तीचे असेल स्क्रिनिंग केलं जाईल, ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षा खालील मूल, गरोदर महिलांना प्रवेश नाही.

● प्रति तास 100 भाविक दर्शन घेतील म्हणजेच दिवसभरात केवळ 1000 नागरिक दर्शन घेतील 4 दिवसांच्या आढाव्या नंतर संख्या वाढवली जाईल.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments