आपलं शहर

मुंबईकरांचं खास अभिनंदन! मुंबईतील कोरोनाबद्दल सर्वात मोठी बातमी

 

मुंबईत सध्या दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे, त्यातच आणखी एक मोठी बातमी मुंबईकरांच्या आनंदात भर घालणारी आहे. ती म्हणजे मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी तब्बल अडीचशे दिवसांनी वाढला आहे. ही मुंबईकरांसाठी आनंदासोबतच विनधास्तपणे जगण्याला सांगणारी बातमी आहे.

मुंबईतल्या एकूण 24 पैकी 21 विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 200 दिवसांपेक्षा जास्त आहे. त्यापैकी 4 विभागांमध्ये 400 हून अधिक, 5 विभागांमध्ये 300 पेक्षा अधिक दिवसांचा कालावधी गाठला आहे.

आतापर्यंतचे टप्पे

20 ऑक्टोबर – 100 दिवस
24 ऑक्टोबर – 126 दिवस
29 ऑक्टोबर – 150 दिवस
5 नोव्हेंबर – 208 दिवस
14 नोव्हेंबर – 255 दिवस

मुंबईतरी कोरोना रुग्णांचा सरासरी दर 0.27 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यात 24 विभागांपैकी 14 विभागांत रूग्ण वाढीचा सरासरी दर 0.27% या सरासरीपेक्षा कमी आहे. आतापर्यंत रूग्ण वाढीचा सरासरी दर 0.33 टक्के इतका होता.

सर्वात जास्त कालावधी असलेले विभाग

E – 482 दिवस
FS – 466 दिवस
C – 444 दिवस
GN – 428 दिवस
B – 392 दिवस

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments