कारण

Stock Market : सध्या एकाच बँकेच्या शेअर्सवर सगळ्यांची नजर, विश्लेषकही देतात हाच सल्ला….

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता भारतीय शेअर बाजारामध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अनेक विश्लेषकही आता शेअर खरेदी करण्याचे सल्ले देत आहेत. मात्र सर्रास विश्लेषक हे एकाच बँकेवर जास्त भर देताना दिसत आहेत, ती बँक म्हणजे आयसीआयसीआय बँक.

सप्टेंबर महिन्यात आयसीआयसीआय बँकेला निव्वळ स्वतंत्र नफा 4,251 कोटी रुपये इतका झाला असल्याने मागच्या तिमाहीत बँकेचे निकाल सर्वाधिक चांगले असल्याचे जाहीर झाले आहेत. गेल्या काही महिन्यात बँकेने विक्रमी नफा कमवला आहे. बँकेतील प्रोविजनिंग कमी झाली आहे, सोबतच दिलेल्या कर्ज वितरणातही रिकव्हरी झाल्याचे दिसून आले आहेत. ऑनलाईन ट्रान्झेक्शनमध्येही वाढ झाल्याचे विश्लेषक सांगतात.

या तिमाहीत बँकेच्या डोमेस्टिक कर्जामध्ये 10 टक्के, रिटेल कर्जात 13 टक्के आणि कॉर्पोरेट लोनमध्ये 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत बँकेने सर्वाधिक मॉर्टगेज लोनही अदा केलं आहे. त्यामुळे बँकेच्या डिपॉझिटमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हीच आकडेवारी बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माहिती देत आहे.

यंदा अनेक शेअरची किंमत 10 टक्क्यांनी खाली आल्याचे चित्र आहे. सध्या आयसीआयसीआय बँकेच्या एका शेअरची किंमत 497 ते 498 या दरम्यान आहे. रॉयटर्स आयकॉनने दिलेल्या माहितीनुसार मागील 3 वर्षांत शेअर्समध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 28 विश्लेषकांनी या प्रगतीला स्ट्राँग बाय रेटिंग दिलं आहे, तर 17 विश्लेषकांनी बाय रेटिंग दिलं आहे. या सगळ्यात होल्ड किंवा सेल रेटिंग कोणीही दिलेलं नाही, त्यामुळे विश्लेषकांच्या माहितीवर सगळ्यांनी विश्वास दर्शवला आहे.

(दिलेलं वृत्त हे माहितीसाठी आहे, यात वंटास मुंबईकडून कोणतेही शेअर खरेदी किंवा विक्री करण्याचे सल्ले देत नाही. किंवा कोणत्याही खरेदी, विक्रीचे मार्गदर्शन करत नाही.)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments