आपलं शहर

धावत्या ट्रेनच्या शौचालयामध्ये महिलेची प्रसुती, गोंडस बाळाचा जन्म

धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. वांद्रेहून गाजीपूराला निघालेल्या ट्रेनच्या एस 12 डब्यात ही प्रसूती झाल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

राजेश विश्वकर्मा व त्यांची गर्भवती पत्नी गुडीया हे रविवारी रात्री उत्तर प्रदेशमधल्या आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. वांद्रे ते गाजीपूर या कोव्हिड विशेष ट्रेनमधून ते उत्तर प्रदेशसाठी रवाना झाले होते. वांद्रे येथून गाडी सुटल्यानंतर विरार स्थानक येताच या महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्या. या वेदना सुरु झाल्यानंतर ती महिला थेट ट्रेनच्या शौचालयामध्ये गेली. असंवेदनशील वेदना होत असल्याने शौचालयामध्येच तिने बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न केला. तिथल्या नागरिकांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाला ही बाब कळवली.

27THgirl baby

ही घटना समजताच पश्‍चिम रेल्वेने या ट्रेनला पालघर येथे थांबा देण्याचे निश्चित केले. आणि रात्री 12.30 च्या सुमारास ट्रेनला पालघर स्थानकावर थांबवण्यात आले. त्याआधी पालघर रेल्वे स्थानक प्रशासनाने बाल रोग तज्ञ व स्त्री रोग तज्ञ यांना पाचारण केले होते. पालघरच्या वैशाली नर्सिंग होमचे डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांनी या ट्रेनमधील महिलेच्या प्रसूत झालेल्या बाळाला प्रसुतीनंतरची प्रक्रिया पूर्ण करत महिलेसह बाळाला आपल्या दवाखान्यात दाखल करून घेतले.

रेल्वे प्रशासनाच्या सज्जतेमुळे यावेळी रुग्णवाहिकाही सज्ज करण्यात आली होती. डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांनी माणुसकी दाखवत या महिलेकडून एकही रुपया न घेण्याचे ठरवले. लॉकडाऊनदरम्यान ट्रेनमध्ये ही पहिलीच प्रसूती असल्याचेही रेल्वेकडून सांगितले जात आहे.

(Woman delivers baby girl in the toilet of a moving train near Khammam)

इतर बातम्या…

Kishori Pednekar | कांजुरमधील कारशेडचे काम थांबवण्यासाठी केंद्र सरकारकडून पत्र – किशोरी पेडणेकर

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments