खूप काही

होय मी ड्रग्सचे सेवन करते, भारतीची एनसीबीसमोर कबुली; आणि…

[et_pb_section admin_label=”section”] [et_pb_row admin_label=”row”] [et_pb_column type=”4_4″][et_pb_text admin_label=”Text”]सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील कलाकारांचे चांगलेच दिवाळे निघताना दिसत आहे. ड्रग्स प्रकरणामध्ये अनेक बड्या कलाकारांची नावे समोर येताना आहेत. त्यात आज नवीन भर पडली, ती म्हणजे फेमस कॉमेडियन अॅक्टर भारती सिंगची.

ड्रग्स प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगला एनसीबीने अटक केली आहे. भारती सिंगच्या घरी आणि कार्यालयावर छापा टाकल्यानंतर एनसीबीने भारतीला सकाळी चौकशीसाठी बोलावले होते. तिची चौकशी केल्यानंतर तिला आज सायंकाळी अटक करण्यात आली.

भारती सिंगच्या घरी छापा टाकल्यानंतर घरातून 86.5 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात भारतीचा पती हर्ष लिंबाचिया याची एनसीबीची चौकशी सुरु असून त्याच्यावरही अटकेची टांगली तलवार आहे.

ड्रग्स प्रकरणात एनसीबीने मुंबईच्या खारदंडा भागात छापा टाकला आणि 21 वर्षांच्या ड्रग तस्कराला अटक केली. त्याच्याकडून 40 ग्रॅम गांजा, ड्रग्ज इत्यादी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींची चौकशी केल्यानंतर भारतीसिंगचे नाव समोर आले. त्यानंतर तिच्या घरी आणि कार्यालयात छापे टाकले. तिथून 86.5 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. एनसीबीच्या चौकशीदरम्यान भारतीने गांजाचे सेवन केल्याचे कबूल केल्याने तिला अटक करण्यात आली आहे.

[/et_pb_text][/et_pb_column] [/et_pb_row] [/et_pb_section]

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments