आपलं शहर

युजीसीने म्हटलं म्हणजे तात्काळ कॉलेज सुरु करणार नाही, शिक्षणमंत्र्यांचा सावधगिरीचा इशारा

दिवाळीनंतर प्रत्यक्षात महाविद्यालये सुरु करण्यासंबंधीच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC – University Grants Commission) केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात संशोधक, पदव्युत्तर पदवी आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु करण्याच्या सुचनाही युजीसी बोर्डाने दिल्या आहेत. बुधवारी (05 नोव्हेंबर रोजी) प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पत्र राज्य सरकारकडे सुपुर्त करण्यात आले आहे. मात्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सावधपणाची भूमिका घेतली आहे.

युजीसीच्या सुचना आल्यानंतर शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह येत युजीसीच्या सुचनांवर सावध वक्तव्य केलं. सध्या राज्यात कॉलेज सुरु करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. युजीसीने दिलेल्या गाईडलाईन्सबाबत नेमलेल्या समितीतील सगळ्या कुलगुरुंची बैठक घेऊ, त्यामध्ये राज्यातील महाविद्यालये कधी सुरु करता येतील, त्यावर पुन्हा विचार केला जाईल, असे मत पत्रकार परिषद घेऊन उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मांडले आहे.

दिवाळीनंतर म्हणजेच येत्या 16 तारखेनंतर सर्व खबरदारी घेऊन महाविद्यालये सुरु करावीत, अशा सुचना युजीसी बोर्डाकडून आल्या असता, दिवाळीनंतर कुलगुरुंची बैठक घेऊन महाविद्यालये सुरु करण्याबाबत विचार करू, असं मत उदय सामंत यांनी मांडलं आहे. युजीसीने दिलेल्या पत्राचा सकारात्मक विचार केला जाईल, असंही ते पत्रकारांशी बोलताना म्हणत होते.

(Explained: When will universities and colleges reopen in India?)

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments