आपलं शहर

26/11 Mumbai Attack : ‘या’ हिरोच्या शरीरातून आर-पार जात होत्या गोळ्या; तरीही नाही सोडली कसाबाची मान…

मुंबईवरील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला आज (26 नोव्हेंबर) 12 वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याने देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण देश हादरून सोडला होता. या हल्ल्यात 166 लोक मारले गेले तर 308 लोक गंभीर जखमी झाले होते. यात अनेक विदेशी नागरिकांचादेखील समावेश होता. हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील 14 पोलीस अधिकारी, कर्मचारी शहीद झाले होते. मात्र, शहीद होता होता मुंबई पोलीस दलाला 9 दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले.

 तुकाराम ओंबाळे या पोलीस अधिकार्‍यांनी पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडून दिले होते. पाकिस्तानविरोधातील कसाब हा सर्वात मोठा पुरावा होता.

ओंबाळेंमुळे कसाब जिवंत पकडला गेला

दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केल्यानंतर ओंबाळे यांना वॉकी-टॉकीवरून संदेश आला. दहशतवादी चौपाटीच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करीत निघाले आहेत. हल्ला झाला त्यावेळी ओंबाळे चौपाटीवर ड्यूटीवर होते. ओंबाळे व आणखी एक सहकारी चौपाटीवर पोहोचले. तेवढ्यात कसाब व त्याच्या साथीदारांची गाडी अंदाधुंद गोळीबार करत चौपाटीकडे येत होती. जेव्हा कसाब व त्याचे साथीदार इतर ठिकाणी हल्ला करून चौपाटीवर पोहोचले तेव्हा ओंबाळेंना त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात कसाबच्या साथीदारांनी ओंबाळेंवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी कसाबला टाकून त्याच्या इतर साथीदारांनी गाडीतून पळ काढला. मात्र कसाब जिवंत सापडला.

या हल्ल्यात दहशतवाद्यांशी कडवी झूंज देऊन त्यांना माघारी परतवण्यात मोठी भूमिका बजावली ती म्हणजे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबाळे यांनी. ओंबाळे यांनी चौपाटीवरच प्राण सोडला, मात्र त्यांच्यामुळेच कसाबला जिवंत पकडण्यात यश आले.

ओंबाळेंच्या कामगिरीमुळे पाकिस्तानविरोधात भक्कम पुरावे…

कसाब जखमी अवस्थेत तेथेच पडून राहिला. त्यामुळे पोलिसांना कसाबला जिवंत पकडण्यात यश मिळाले. पुढे कसाबमुळेच हा खटला आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला, भारताने पाकिस्तानचे पितळ उघडं पाडले. याचबरोबर हल्ल्याला चार वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून कसाबला पुण्यातील येरवडा तुरुंगात फासावर लटकवले. त्यामुळे ओंबाळेंनी आपल्या प्राणाची आहुती दिली तरी त्यांच्या धाडसामुळे कसाब हाती लागला. ओंबाळेंच्या या कर्तृत्वामुळे 26 जानेवारी 2009 रोजी त्यांना मरणोत्तर अशोकचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.

35525b22 ef44 11e8 8d4e 8c144d313201

(2008 Mumbai Terror Attacks: All you need to know about 26/11 attacks that shook the Financial Capital of India.  Tukaram Omble and Assistant sub-inspector of Mumbai Police gave their life to nab the lone surviving terrorist Mohammad Ajmal Amir Kasab.)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments