खूप काही

आज नोंदवला गेला टीम इंडीयाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

सध्या ऑस्ट्रेलियात भर विरुद्ध ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका सुरू आहे. त्यातला पहिला सामना ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सने भारतावर विजय मिळवला आहे. मात्र या सामन्यादरम्यान भारतीय संघाकडून खराब खेळी झाल्याचे पाहायला मिळते.

ऑस्ट्रेलियाने 4 कसोटी सामन्यांच्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे, अजून जरी 3 सामन्यांची संधी भारताकडे असली तरी या खराब खेळीत भारताचा दिग्गज खेळाडूही जखमी झाला आहे. त्यामुळे पुढील 3 कसोटी सामने भारतासाठी मोठे लक्ष असणार आहेत.


पहिल्या सामन्यात काय झालं?
पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 244 धावांच आव्हान दिलं होतं, ते आव्हान संपुष्टात आणताना ऑस्ट्रेलियाने फक्त 191 धावा केल्या. भारताचा खरा कस दुसरा डाव खेळताना लागला, मात्र सर्वाधिक खेळाडूंनी खराब खेळी करत नको असलेला रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला.  भारताने दुसऱ्या डावात पूर्ण बाद 36 धावा काढल्या, त्यामुळे सरते शेवटी ऑस्ट्रेलियासमोर एकूण 90 आव्हान भारताने दिले. ते आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 बाद 93 धावा काढत पूर्ण केले.


लाजीरवाणा विक्रम
याआधी म्हणजेच 1955 साली असाच एक विक्रम न्यूझीलंडच्या नावावर नोंदवला आहे. त्यानंतर कसोटीतील सर्वात निच्चांकी धावसंख्या भारताच्या नावावर नोंदवली गेली आहे. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात 1955 मध्ये कसोटी सामना खेळण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने एका डावात 26 धावा केल्या होत्या. तब्बल 65 वर्षानंतर ही निच्चांकी धावसंख्या झाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात निच्चांकी धावसंख्येचा लाजीरवाणा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. त्यानंतर भारताचं नाव घेतलं जेल.

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि आर आश्विन यांना दुसऱ्या डावात एकही धाव काढता आली नाही. तर इतर खेळाडूंना दुहेरी आकडादेखील गाठता आला नाही

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया : मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), आर. अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ : टीम पेन (कर्णधार), जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मोझेस हेन्रीक्स, मार्नस लॅब्यूशाने, नॅथन लायन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन आणि मॅथ्यू वेड.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments