कारण

‘शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा;’ पडळकरांचं संजय राऊत यांना खरमरीत पत्र

भाजप नेते, विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि खासदार संजय राऊत यांच्यातलं शाब्दिक वॉर आता चव्हाट्यावर आलं आहे. सामनातून संजय राऊतांनी टीका करताच गोपीचंद पडळकरांनीदेखील पत्र लिहून संजय राऊत यांना चांगलच सुनावलं आहे. अनेक मुद्यांवर संजय राऊत यांची कोंडी करण्याचा प्रयत्न पडळकरांनी केला आहे.

आपण मला फेकुचंद म्हणलात, खरतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबर्या, चमचा म्हणू शकतो, पण माझी ती संस्कृती नाही, मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षा काय करणार, आपली लेखणी कधी धनगर व भटक्यांसाठी झिझवली का? असा सवाल पडळकरांनी पत्रातून संजय राऊतांना केला आहे.

सगळ लक्ष मुंबईतल्या नाईटलाईफमध्ये असणार्या बोलघेवड्यांना महाराष्ट्र कसा कळणार, एखाद्या नटीला जेरीस आणून ‘उखाड दिया’ म्हणत भुरट्या मर्दानगीचं प्रदर्शन मांडण्यात कसलं आलय स्त्रीदाक्षिण्य, तुमचा पगार किती तुम्ही बोलता किती? अशी खरमरीत टीकाही पडळकरांनी संजय राऊतांवर केली आहे.

अधिवेशनादरम्यान आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन गोपीचंद पडळकरांनी राज्य सरकारवर टीका केली होती. धनगरी समाजाचा वेष परिधान करुन गोपीचंद पडळकरांनी विधानभवनात आंदोलनही करण्याचा प्रयत्न केला होता, यालाच उत्तर देताना संजय राऊत यांनी पडळकरांवर टीका करताना “फेकूचंद पडळकर” असा शब्द प्रयोग केला होता. मात्र पडळकरांनी पत्राद्वारे संजय राऊत यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments