कारण

थेट CBI ची होणार चौकशी; 103 किलो सोने CBI च्या रेकॉर्डमधून गायब

 

जी संस्था देशातील सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते, ज्या संस्थेचं नाव घेतल्यानंतर भल्या भल्यांना घाम फुटतो, अशा CBI संस्थेची चौकशी होणार आहे. याला कारण ठरलं आहे ते म्हणजे CBI च्या रेकॉर्डमधून तब्बल 103 किलो सोने गायब झाले आहे. (Central Bureau of Investigation – केंद्रीय अन्वेषण ब्यूरो) CBI च्या ताब्यात असलेल्या एकूण 400 किलो सोन्यापैकी 103 तोळे सोने गायब झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

CBI ची चौकशी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं म्हटलं जात आहे. देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिंन्ह उपस्थित झाल्यामुळे देशाच्या अस्मितेवरही काहींनी प्रश्न उपस्थित केला आहे. CBI च्या चौकशीचे प्रकरण हे फक्त 5 ते 6 तोळ्यांचे नसून तब्बल 103 किलो सोन्याच्या चौकशीचे आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात यावर चर्चा होत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की इतके सोने नेमके कुठले आणि कधीचे?

तामिळनाडूच्या सुराणा कॉर्पोरेशमध्ये सीबीआयने 2012 साली छापा टाकला होता. या छाप्यात सीबीआयला तब्बल 400 किलो सोने सापडले होते. तेव्हापासून हे सोने सीबीआयच्या ताब्यात आहे. अनेकदा सीबीआयच्या ताब्यात असलेल्या अनेक गोष्टींची पुन्हा एकदा तपासणी होत असते, तशाचप्रकारची तपासणी झाल्यावर ही बाब उघड झाली आहे. जप्त केलेल्या सोन्याचे सध्याच वजन करण्यात आलं, या वजनात तब्बल 103 किलोंची तफावत जाणून आली, 103 किलो सोनं कमी असल्याचा प्रकार समोर आला.

सीबीआयसोबत झालेल्या या प्रकारामुळे सर्वोच्च न्यायालयाने चक्क सीबीआयच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आता तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की देशातील सर्वोच्च सुरक्षा यंत्रणेची चौकशी कोण करणार?

सीबीआयची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने चक्क सीबी-सीआयडीची नियुक्ती केली आहे. एका राज्य सरकारचे गुन्हे अन्वेशन विभाग ही चौकशी करणार आहे. सीबीआयने या चौकशीला विरोध केला होता, मात्र कोर्टाने सीबीआयच्या या विरोधाला फटकारले आहे. ही चौकशी एसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार असल्याचंदेखील सांगितलं जात आहे.

तुमच्या माहितीसाठी
सध्या (12 डिसेंबर 2020 रोजी) भारतात सोन्याचा एक किलोचा दर 4,361,968 रुपये इतका आहे, म्हणजेच 400 किलो सोन्याची किंमत आजच्या बाजारभावानुसार 1,744,787,200 रुपये इतकी होते. तर गायब झालेल्या 103 किलो सोन्याची किंमत 449,282,704 रुपये इतकी होते.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments