कारण

सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दणक्यात भाषण, विरोधकांनाच धरलं धारेवर, मराठा आरक्षणावरही मोठं विधान

शांततेचा चेहरा म्हणून बघितले जाणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमीच शेलक्या शब्दात विरोधकांवर टीका करतात. विरोधकांना सडेतोड उत्तर देताना शिवसेनेचा वाघ डरकाळला असे म्हटले जाते. दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीदेखील हेच झालं. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात विरोधकांना चांगलेच खडसावले आहे. सभागृहात दणदणीत आवाजात मुख्यमंत्री असल्याचा रुबाब उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दाखवून दिला.

विरोधकांनी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरुन आघाडी सरकारवर अनेक टीकेचे भडिमार केले. त्याला उद्धव ठाकरे यांनी नेहमीच शांतपणे प्रतिक्रिया दिली, हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खणखणीत भाषण करुन विरोधकांना जशासतसे उत्तर दिले.

हिंदुत्वावरुन काय म्हणाले मुख्यमंत्री?
पुढील काही वर्षांमध्ये आम्ही प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठीही काम करणार आहोत. यावरुन आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, हे लक्षात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच महाविकास आघाडीच्या वर्षपूर्ती निमित्ताने लिहिलेल्या पुस्तकारावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका टिपणी केली होती, यावर उत्तर देत “मागील पाच वर्षात कुंडल्या पाहणारे, हे सरकार पडणार, असे मुहूर्त सांगणारे आता ते सोडून पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत, ही चांगली गोष्ट आहे.” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

आता हे सगळं असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा कसा मागे राहील. मराठा आरक्षणावरुन विरोधकांनी अनेक मुद्दे मांडत सरकारच्या चुका दाखवून देण्याचा प्रयत्न केला. यावर मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडत मुख्यमंत्री “मराठा समाजाला आरक्षण देण्याची लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी वकिलांची फौज तयार केली आहे.” याशिवाय मराठा आरक्षणावर बोलताना, सभागृहातील हे भाषण रेकॉर्ड होत आहे आणि होऊदेतही, कारण मराठा आरक्षणाबद्दल पुन्हा एकदा मी स्पष्ट करतो की, “मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही” असे ठामपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना लावलेल्या ईडी चौकशी बद्दलही उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. तुमच्या आवडीच्या व्यक्तीवर बोललं की तुम्ही ईडी लावाल, हे घाणेरड्या विकृतीचे राजकारण आहे आणि ईडीची अब्रू चव्हाट्यावर मांडण्याचे काम केंद्र सरकार करत असेल आणि कुणीही येईल टपली मारुन जाईल, हे आम्ही सहन करणार नसल्याचे उद्धव ठाकरे त्यांनी सभागृहातील अध्यक्षीय भाषणuddhva thackeray

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments