फेमस

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर झळकणारा पहिला मुंबईकर रॅपर

टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर दिसणारा हा फोटो एका भारतीय रॅपरचा आहे. डिवाइन (Devine) हा एकमेव भारतीय रॅपर ठरला आहे, ज्याची दखल थेट टाइम्स स्क्वेअरने घेतली आहे.

डिवाइनने काही दिवसांपूर्वीच त्याचा नवा अल्बम ‘पुण्य पाप’ लॉंच केला होता, तो अल्बम ऍपल म्युझिक इंडियावर लॉंच होताच सर्व श्रेणीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

20201213 200707
Divine is 1st Indian rapper on Times Square billboard

‘पुण्य पाप’च्या11-ट्रॅक अल्बममध्ये भारतीय तसेच अनेक विदेशी कलाकारांनी मदत केली आहे. हिप-हॉपसाठी वेटर्न नास, ग्रॅमीपुरस्कार विजेता विजेत्या ब्रूकलिन-आधारित गायक-गीतकार कोको सराय, ब्रिटीश ड्रिल रॅपर दुचावेल्ली, ग्रॅमीपुरस्कार विजेत्या ब्रूकलिन आधारित गायिका कोको सराय, ब्रिटीश ड्रिल रॅपर डुचवेल्ली, ग्रॅमी पुरस्कार विजेता निर्माता आयएलएल वायनो, लंडनस्थित डान्सर स्टायलो जी आणि अनेक भारतीय आणि अमेरिकन गायकांनी डिवाइनला साथ दिली आहे. लिसा मिश्रा यांनी या गाण्याचे लेखन केले आहे.

कोणत्याही कलाकारासाठी अल्बम लॉंच करणे, हा नेहमीच महत्त्वाचा टप्पा असतो. माझ्या पूर्वीच्या अल्बम ‘मिर्ची’ ने सोशल मीडियावर मोठं यश मिळवलं आहे. मी माझ्या चाहत्यांचा पूर्णपणे आभारी आहे,चाहत्यांनी दिलेली साथ अशीच राहू द्या, असं मत डिवाइनने मांडल आहे.

व्हिव्हियन फर्नांडिस, ज्याला त्याच्या स्टेव्ह म्हणजेच ‘डिवाइन’ या नावाने अधिक ओळखले जाते, डिवाइन हा तसा मुंबईकर आहे. ‘ये मेरा बॉम्बे’ (2013) हे गाणे रिलीज झाल्यानंतर त्याला लोकप्रियता मिळू लागली. त्याने मुंबईतील रॅपर नायझीचे ‘मेरे गल्ली में’ हे गाणे प्रदर्शित केले, इथूनपुढे डिवाइन प्रसिद्धी झोतात येऊ लागला. सध्याचे त्याचे Mirchi हे गाणे सर्वाधिक लोकप्रिय आहे.

Mass Appeal India ने घेतलेली डिवाइनच्या गाण्याची दखल…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments