खूप काही

आई-बहिणीवरुन शिवी दिल्यास तुम्हालाही राग येतो? मग हा लेख तुमच्यासाठी

सद्या तरुण वर्गामध्ये एक ट्रेंड खूप चालत आहे, तो म्हणजे शिव्या देण्याचा. प्रत्येकजण कोणतीही गोष्ट समोरच्याला सांगत असेल, तर त्यामध्ये शिव्यांचा वापर होतच असतो. मग ती गोष्टी कितीही चांगली असू द्या किंवा वाईट. आजकालच्या सर्रास वेब सेरिजमध्येदेखील शिव्यांचा वापर होत असतो, जो तरुण वर्गाला आकर्शित करत असतो. (Do you get angry if you are abused by your mother or sister? Then this article is for you)

आता तुम्ही म्हणाल की वंटास टीमने मध्येच हा शिव्यांबद्दल विषय का काढला?

जसं तुमच्यापैकी काहींना आईवरुन, बहिणीवरुन, एखाद्या जातीवरुन किंवा लिंगावरुन शिव्या दिलेलं आवडत नाही, तसंच अशा शिव्या दिलेल्या अजून दोन तरुणींनाही आवडत नाही. त्यामुळे त्यांनी एक प्रोजेक्ट सुरु केलाय. त्या प्रोजेक्टचं नाव आहे ‘द गाली प्रोजेक्ट’. त्या दोघींमध्ये मुंबईच्या नेहा ठाकूरचाही समावेश आहे.

नागरिकांनी शिव्या द्याव्यात मात्र त्या कोणतेही लिंग किंवा जातीवर आधारित नसाव्यात, असं या तरुणींचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी ग्राफिक्सच्या माध्यमातून अशा शिव्या तयार केल्या आहेत आणि लोकांपर्यंत पोहचवत आहेत. त्यांनी सुरु केलेली ही पध्दत लवकर लोकांना पटणार नाही, मात्र चांगल्या कामाला उशीर लागतोच, असेही त्या म्हणतात, त्यामुळे त्यांनी सुरु केलेला हा उपक्रम नेमका लोकांना कितीपत आवडतो, हेच पाहणे गरजेचे असणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments