कारण

आज मुंबईत मद्य विक्रीवर बंदी कारण ….

 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64वा महापरिनिर्वाण दिन. दरवर्षी या दिवशी लाखो अनुयायी मुंबई परिसरातील चैत्यभूमीजवळ अभिवादन करण्यासाठी येत असतात. यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे सुरक्षेच्या दृष्टीने घरी राहून, आहे त्याच जागी राहून नागरिकांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहर परिसरात किरकोळ मद्य विक्री बंद ठेवण्यात येणार आहे.

शांततेच्या दृष्टीने आणि एकूणच परिस्थिती पाहता मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहर जिल्ह्यातील दादर, शिवाजी पार्क, माहिम, धारावी, सायन, करीरोड स्टेशन पर्यंतचा सर्व भाग, वरळी सी फेस, वरळी कोळीवाडा ते संगम नगर पर्यंत हद्दीमधील भागात स्थित असणाऱ्या तसेच सायन कोळीवाडा, किंग्जसर्कल, ॲन्टॉपहिल, वडाळा, शिवडी, काळाचौकी, भोईवाडा पर्यंत हद्दीमधील सर्व किरकोळ मद्याची दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत.

तसेच शांतता भंग व दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments