आपलं शहर

कोरोना काळात जनता उपाशी मंत्र्यांचे कंत्राकदार तुपाशी, मंत्र्यांच्या बंगल्यावर अवाढव्य खर्च

कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने अनेक विकास कामांना निधी मिळत नसल्याचे चित्र एकीकडे असताना दुसरीकडे मंत्र्यांची मंत्रालयातील दालने त्यांचे बंगले यावर तब्बल 90 कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

कोणत्या बंगल्यावर किती खर्च हे जर पाहिलं तर जनतेला कोरोनाची झळ बसली परंतु मंत्र्यांच्या चैनीला ही झळ बसलीच नाही असं चित्र दिसत आहे. सार्वजनिक बांधकामाची अनेक कामे ही निधी अभावी खोळंबली आहेत. अनेक कंत्राकदारांना पैसे मिळाले नसल्याने त्यांनी काम थांबवली आहेत परंतु मंत्र्यांची दालने आणि केबिनचे हिल मात्र पास झाल्याने त्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळं मंत्र्यांच्या दालनाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्याला 3 कोटी 26लाख खर्च झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याला 1 कोटी 78 लाख खर्च झाला आहे.

उर्वरित मंत्र्यांच्या बंगल्याचा खर्च

  • महसूलमंत्री बाळासाहेब थोरात – रॉयलस्टोन – 2 कोटी 26 लाख
  • बांधकाममंत्री अशोक चव्हाण – मेघदूत – 1 कोटी 46 लाख
    सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे – चित्रकूट – 3 कोटी 89 लाख
  • उद्योग मंत्री सुभाश देसाई – शिवनेरी – 1 कोटी 44 लाख
    अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ – रामटेक – 1 कोटी 67 लाख
  • वैदकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख – बी3 – 1 कोटी 40 लाख
  • पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे – सातपुडा – 1कोटी 22 लोक
  • नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे अग्रदूत आणि नंदवन 2 कोटी 80 लाख

हा खर्च केवळ ठराविक मंत्र्यांच्या बंगल्याचा आहे. एकीकडे कोरणामुळे जनता हवालदिल असताना मंत्र्यांच्या बंगल्यावर अधिक खर्च करण्याचा कल दिसून आला आहे.

राज्यातून अनेक ठिकाणाहून मंत्र्यांच्या घरी लोक येत असतात बंगल्याची पडझड झाली असल्याने डागडुजी करणं गरजेचं होतं त्यामुळे थोड्याफार प्रमाणात आम्ही खर्च केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments