फेमस

“सर्च इन ईयर” 2020 ची यादी गुगलकडून जाहीर, यात गाजलेला सुशांत नसून अंकिता….

 

कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे 2020 हे वर्ष सर्वांच्या नेहमीच लक्षात राहणारे ठरणार आहे. या संपूर्ण वर्षाने आपले जीवन कायमचे बदलले. आपल्या जीवनाचा कायापालट करणाऱ्या अनेक गोष्टी या वर्षांत घडल्या. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून आपण सगळं काही करू शकतो हे आपल्याला कोरोनाने शिकवले, तसेच सर्वांनी सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करत आपल्या कलाकृतींना वाव दिला. अनेक चेहऱ्यांना कोरोना काळात चांगलीच पसंती मिळाली. आता वर्षे संपताना गुगलने एक मोठी आणि धक्कादायक ब्रेकिंग न्यूज दिली आहे.

गुगलने 2020 मध्ये भारतातील “सर्च इन ईयर” म्हणजे संपूर्ण वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या दहा व्यक्तीची नावे जाहीर केली आहेत. काही आपल्या कामाने तर काही ट्रोल झालेल्या कारणाने गुगलवर 2020 मध्ये सर्वाधिक सर्च केलेले व्यक्ती आहेत. गुगलने ही यादी जाहीर करताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पाहुयात या यादीत कुणाचा समावेश आहे.

1. जो बायडन

images 12

 

 

 

बलाढ्य मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणारा जगातील सर्वात सामर्थ्यवान माणूस ठरला तो म्हणजे जो बायडन. नक्कीच, ते अव्वल स्थानास पात्र आहेत. खरे तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत जो बायडन यांच्याविषयी फारशी कुणाला कल्पना ही नसावी पण जेव्हा ट्रम्प यांना पराभूत करण्यात ते यशस्वी झाले तेव्हा प्रत्येकाने त्यांची दखल घेतली.

2. अर्णब गोस्वामी

ArnabGoswami Sylized 041220 1200x800

 

“पुछता है भारत” गुगल पे कोण है अर्णब गोस्वामी. पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी 4 नोव्हेंबर नंतर सर्वाधिक सर्च करण्यात आल्याची माहिती गुगलने दिली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्या दिवशी अर्णब यांना राहत्या घरी अटक करण्यात आली होती.

3. कनिका कपूर

images 13

 

 

बेबी डॉल सिंगर कनिका कपूर ही कोरोना काळातील पहिली भारतीय सेलेब्रिटी होती जी कोरोनाचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरली. लखनौमधील प्रमुख राजकारण्यांसह पार्टीला उपस्थित राहिल्यानंतर तिच्यासोबत अनेकांना कोरोनाव्हायरसचा प्रसार झाला आणि ट्रोल होत तीने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले. कनिकावर गंभीर आजाराला दुर्लक्षित केल्याच्या कृतीबाबद्दल तिच्यावर एफआयआर नोंदविण्यात आली.

4. किम जोंग-उन

images 14

 

उत्तर कोरियाचे डिक्टेटर किम जोंग-उन जिवंत आहे की मृत, यावर्षी प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न होता. त्यांच्या आरोग्याविषयी कोणतीही माहिती नसल्यामुळे, भारतीय लोक त्याच्याबद्दल विशेष उत्सुक राहिले, विशेषत: कोमामध्ये असल्याची अफवा पसरल्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल झाले.

5. अमिताभ बच्चन

images 15

 

बीग बी अमिताभ बच्चन यांना जेव्हा कोरोनाची लागण झाली त्यांनतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रकृती विषयी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली. तसेच त्यांच्या प्रकृती बद्दलचे अपडेट जाणून घेण्यासाठी त्यांना सर्वाधिक फॉलो केले गेले.

6. रशीद खान

images 16

पहिल्या दहा मोस्ट सर्च मध्ये मेगा खेडाळू विराट कोहली आणि धोनी यांची पीछेहाट करून अफगाणिस्तानच्या क्रिकेटर रशीद खान भारतात सर्वाधिक सर्च केला गेला. ड्रीम 11 आयपीएल 2020 मध्ये रशीदच्या कामगिरीनंतर त्याच्या लोकप्रियतेत ही वाढ दिसून आली.

7. रिया चक्रवर्ती

images 17

 

सुशांतच्या मृत्यूनंतर रियाने राष्ट्रीय मथळ्यांवर वर्चस्व राखले आणि दिवंगत अभिनेत्याच्या कुटूंबाने तिच्याविरूद्ध आत्महत्येचा खटला नोंदविल्यानंतर तीची सर्वात जास्त चर्चा झाली. तसेच बॉलीवूडच्या ड्रग प्रकरणात तिचे नाव पुढे आल्यानंतर ती सर्वाधिक ट्रोल झाली होती.

8. कमला हॅरिस

images 20

ऑगस्ट 2020 मध्ये कमला हॅरिसने अमेरिकेच्या उपाध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक उमेदवारी स्वीकारली तेव्हा इतिहास रचला गेला. पुढे जाऊन नोव्हेंबरमध्ये हॅरिस यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांना सर्वाधिक लोकप्रिय मिळाली.

9. अंकिता लोखंडे

images 18

सुशांतसिंग राजपूत याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता ही सुशांत आत्महत्या प्रकरणानंतर सोशल मीडियाद्वारे पुढे आली. सुशांतच्या जीवनाशी संबंधित असलेल्या अंकिताला सर्वाधिक सर्च केले गेले.

10. कंगना रनौत

images 19

 

कंगना रनौत ही अभिनेत्री सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली ती अजूनही कायम आहे. सुशांतसिंग प्रकरण असो, शेतकरी समस्या, महाविकास आघाडीशी घेतलेला पंगा की तीच्या घरावर बीएमसीचा बुलडोझर अश्या अनेक वादाच्या परिस्थितीत कंगना लाईम लाईट मध्ये राहिली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments