कारण

कसं सुरु आहे ठाकरे सरकारचं हिवाळी अधिवेशन? कोणत्या विषयांवर होणार चर्चा? वाचा सविस्तर

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून (14 डिसेंबर 2020  आणि 15 डिसेंबर 2020) होत  आहे. हे अधिवेशन केवळ 2 दिवसांच असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे कोरोनाचे नियम पाळून हे अधिवेशन सुरू होईल.

पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव असतील तर दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्यांवर सरकारकडून व विरोधकांकडून सविस्तर चर्चा केली जाईल. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून विरोधीपक्षातील ठराविक नेत्यांना व इतर महत्वाच्या सदस्यांना चाय पाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजण केले जाते परंतु या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार टाकला होता. आम्ही वेळोवेळी मागणी करत होतो की हे अधिवेशन कमीतकमी दोन आठवड्याचे घ्यावे, महाराष्ट्रात अनेक विषय असून त्यावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन दिवसाचे अधिवेशन असावे परंतु सरकार चर्चेपासून पळ काढत आहे, म्हणून आम्ही या चाय पाण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

चाय पाण्याच्या कार्यक्रमानंतर राज्य सरकारकडून पत्रकार परिषदेत  अनेक गोष्टींची माहिती देण्यात आली. दोन दिवसीय अधिवेशनात कोणते विषय पटलावर मांडण्यात येतील तसेच कशी चर्चा असेल याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी माहिती दिली.

सभागृहाच्या पटलावर 10 विधेयकांसह 6 अध्यादेश मांडले जाणत आहेत. महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा बसण्यासाठी शक्ती विधेयकही विधिमंडळात मांडण्यात येणार आहे.

मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदा यांच्या पुढे ढकलेल्या निवडणुका, तसेच अनेक मुद्रांक शुल्कात केलेल्या कपाती, औद्योगिक नगरी अध्यादेशात सुधारणा या प्रकारचे प्रस्ताव नगरविकास खात्याकडून मांडण्यात येणार आहेत.

सहकारी संस्थांमधील महत्वाच्या विषयांना मंजुरी संबंधित संचालक मंडळांनी देण्याचे अधिकार देणारा  सहकारी संस्था अध्यादेश, सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ३१ मार्च २०२१ पर्यंत घेण्यास परवानगी देणे, लेखापरिक्षण अहवाल ३१ डिसेंबर २०२०  पर्यंत सादर करण्यासाठी वाढ करणे सोबतच नविन संचालक मंडळ गठीत होईपर्यंत  गृह निर्माण संस्थेच्या विद्यमान समितीचे संचालक कामकाज पाहतील अशी तरतुद करण्यासाठी ‘महाराष्ट्र सहकारी संस्था अध्यादेश मांडण्यात येईल, यासाठी सहकार आणि पणन खात्याकडून विधेयक मांडण्यात येईल.

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे नवीन महाविद्यालय, नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देणे, सोबतच सन २०२०-२१ यावर्षी करिता नवीन वेळापत्रक सादर करण्याचे विधेयक  शिक्षण मंडळाकडून मांडण्यात येईल.

यासोबत इतर काही विधेयके आणि प्रस्ताव या दोन दिवशीय अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments