खूप काही

वांद्रे पोलीस स्टेशनचा लूक बदलण्याची जबाबदारी चक्क हृतिक रोशनच्या एक्स बायकोवर

हृतिक रोशनची पहिली पत्नी सुजैन खान हिने वांद्रे पोलीस ठाण्याची पायरी चढली आहे, सध्या बॉलिवूड कलाकार आणि मुंबई पोलीसांसह ईडीचं सुरू असलेलं चर्चा सत्र यामुळे सुजैन खानच्या घटनेकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोनही काहीसा सर्वसामान्य असेल. पण इथे कुठल्याही गुन्ह्याची चौकशी नसून चक्क वांद्रे पोलीस ठाण्याचा चेहरा मोहरा बद्दलण्यासाठी दिलेली भेट होती.

बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रोफेशनने इंटेरिअर डिझायनर असलेली सुजैन खान पोलीस स्टेशनच्या रिकंस्ट्रक्शनच्या मॉनिटरिंगसाठी गेली होती. तिच्यासोबत IPS अधिकारी अभिषेक सिंह असल्याने चर्चांना उधाण आले होते. मात्र पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत झाल्यानंतर या भेटीमागचे खरे कारण समोर आले.

हृतिक रोशन आणि सुजैन खान हे दोघे 2000 साली लग्नबेडीत अडकले होते. मात्र नात्यात निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांमुळे तब्बल 13 वर्षानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि दोघेही एकमेकांपासून विभक्त झालेत.

हृतिक आणि सुजैन यांच्या नात्यात जरी दरी निर्माण झाली असली तरी आम्ही आमच्या मुलांसाठी कमिटेड आहोत आणि मुलांसाठी आम्ही कधीही एकत्र येऊ, असं मत खुद्द सुजैनने पत्रकारांसमोर मांडल होतं. लॉकडाऊनदरम्यान मुलांची काळजी घेण्यासाठी हृतिक आणि सुजैन दोघेही एकत्र राहत होते. त्यामुळे त्यांच्यातील वाद मिटल्याच्या अनेक चर्चाही व्हायरल झाल्या होत्या.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments