कारण

मंत्रालयावर मराठा आंदोलकांचा गनिमीकावा? पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न; टोलनाक्यांवर चोख बंदोबस्त

हिवाळी आदिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी मराठा  मोर्चेकरी आंदोलन करणार असल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेला समाज रस्त्यावर उतरला आहे, त्यामुळे मुंबईच्या सीमेवरील टोलनाक्यांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुंबईतील टोलनाके, वांद्रे येथील मातोश्री परिसर, मंत्रालय आणि अनेक शासकीय इमारतींजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आनंदनगर चेक नाक्यावर महाराष्ट्र राज्य परिवहनच्या गाडीवर भगवा झेंडा लावल्याचे पोलिसांना दिसून आले होते, त्यामुळे  गाडीतील प्रत्येकाच्या तिकीटांची तपासणी करून पुढे सोडन्यात आहे. पोलिसांकडून गाडीवरील भगवा झेंडा उतरवण्यात आला. संबंधित गाडीमध्ये सर्व सामान्य सरकारी कर्मचारी आणि इतर कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे अशाप्रकारचा गनिमीकावा करत मराठा आंदोलक मंत्रालयावर मोर्चा काढण्याची शक्यता आहे.

वाशीकडून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची संख्याही आज वाढलेली दिसत आहे. जवळपास 4 किमी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आज मोठ्या संख्येने नवी मुंबईतील मराठा आंदोलक मंत्रालयाकडे जाणार असल्याने ही त्यासंबंधीची गर्दी असल्याचेही म्हटले जात आहे. पोलिसांकडून खबरदारीचा ऊपाय म्हणून मुंबईच्या सीमेवरील अनेक टोलनाक्यावर पोलिसांची नजर आहे. मुबंई – पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोलनाक्यावर पोलीसांकडून अनेक संशयित वाहनांचे नबंर, नाव नोदंणीदेखील सुरू आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments