आपलं शहर

मोदींच्या बुलेट स्वप्नावर, ठाकरेंचे मेट्रो कारशेड

आरे जंगलात मुंबईतील मेट्रो-3 साठी कारशेड उभारणार होते. मात्र अनेक समाजिक कार्यकर्त्यांनी आणि पर्यावरण प्रेमींनी उभारलेल्या आंदोलनामुळे हा निर्णय ठाकरे सरकारने मागे घेतला. आरेमध्ये कारशेड न उभारता थेट कांजूरमार्गमधील जमिनीवर कारशेड उभारलं जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली. मात्र तिथेही राज्यसरकारसमोर विघ्ने आलीच.

कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास केंद्र सरकारने विरोध केला आहे. सोबतच केंद्राने राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे, सुनावणी करताना जोपर्यंत निकाल येणार नाही, तोपर्यंत कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश उच्च न्यायलयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या स्थगितीमुळे राज्य सरकारने आपला निर्णय बदलला असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्य सरकारने मेट्रो -3 च्या कारशेडसाठी कांजूरमार्ग ऐवजी आता वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेची निवड करण्याची शक्यता आहे. मेट्रोचा प्रकल्प संपूर्ण मुंबईकरांसाठी खूप महत्वाकांक्षी आहे. कांजूरमार्गबद्दल न्यायलयाचा निर्णय दिर्घकालीन चालण्याची शक्यता आहे, त्यामुळे कांजूरमार्गऐजी दुसऱ्या जागेची राज्य सरकारकडून निवड करण्याची शक्यता असल्याचे अनेक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, त्याप्रकारची बैठकही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अनिल परब, आदित्य ठाकरे यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये झाल्याचे समजते.

मेट्रो कारशेडला विरोध केलात तर बुलेट ट्रेन प्रकल्पाला अजिबात सहकार्य करणार नाही, असा संदेश ठाकरे सरकारने याद्वारे केंद्राला दिल्याचे मानले जाते. कारण ज्या जागेची चाचपणी राज्य सरकारकडून केली जात आहे, त्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनचं कारशेड उभारणार होते. मात्र आता मोदींच्या बुलेट स्वप्नावर, ठाकरेंचे मेट्रो कारशेड उभारण्याची दाट शक्यता असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments