कारण

अॅमेझॉननंतर मनसेचा मोर्चा पश्चिम रेल्वेकडे; ‘मराठीचा समावेश करा, अन्यथा खळखट्याकला तयार राहा’

ऑक्टोबर महिन्यापासून मनसे विरुद्ध अॅमेझॉन हा वाद सुरू आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी बिकेसी येथील अॅमेझॉनच्या कार्यालयात जाऊन अॅमेझॉन अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करावा अशी विनंती केली होती. दिवाळीपर्यंत मराठी भाषेचा समावेश करावा अथवा मनसे स्टाईने दिवाळी साजरी होईल असही सांगण्यात आलं होतं. या विनंतीनंतर मनसेला अॅमेझॉनकडून मेल पाठवून आम्ही योग्य तो बदल करू अस आश्वासन दिले होते परंतु नंतर हे आश्वासन पाळले जाणार नाही, असं उत्तर अमेझॉनकडून आल्यानंतर मनसेने खळखट्याकला सुरवात केली.

मुंबईत अनेक ठिकणी मनसेने ‘नो मराठी नो अॅमेझॉन’ ही मोहीम सुरू केल्यानंतर अॅमेझॉनकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटिस पाठवली होती, यामुळे मनसे अधिक तीव्र होऊन अमेझॉनची अनेक कार्यालये फोडायला सुरवात केली, शेवटी अमेझॉनने मनसे पुढे कमीपणा घेतला आणि मराठी भाषा पुढच्या 7 दिवसात येईल असं सांगण्यात आलं आहे.

एवढं करून मनसे शांत बसली नाही, अॅमेझॉन मोहीम फत्ते करून मनसेचे शिलेदार आता पश्चिम रेल्वेकडे वळले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी पश्चिम रेल्वेला पत्र लिहून इशारा दिला आहे की पश्चिम रेल्वेच्या येणाऱ्या जाहिराती, पत्रक तसेच सोशल मीडिया या ठिकाणी मराठी भाषेचा समावेश करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

IMG 20201227 WA0035

मध्य रेल्वेमध्येदेखील मराठीत जाहिराती, पत्रक येत नव्हती, पण ती आता येत असतात परंतु पश्चिम रेल्वेमध्ये जाहिराती, पत्रक आणि सोशल मीडिया या ठिकाणी देखील मराठी असावी.  शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्याची भाषाही वापरणे गरजेचे आहे. परंतु पश्चिम रेल्वेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे लवकरात लवकर मराठीचा देखील समावेश करावा. अन्यथा रेल्वे विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल. – जितेंद्र पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments