खूप काही

अॅमेझॉनला दनका, फ्लिपकार्टची समजूतदारी, अॅपवर मराठीचा पर्याय

सध्या सुरु असलेल्या मनसे आणि अॅमेझॉन यांच्यातला वाद चर्चेत असताना फ्लिपकार्टने बाजी मारली आहे. फ्लिपकार्टने त्यांच्या संकेत स्थळावर मराठी भाषेचा पर्यायही दिला आहे. इंग्लिश, हिंदी, तेलगू, तामिळ, कनडासह फ्लिपकार्टमध्ये मराठी भाषेचीही निवड करण्यात येणार आहे. काही महिन्यापूर्वी ट्विटरवर अनेकांनी फ्लिपकार्टमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची मागणी केली होती, त्यामागणीवर आम्ही लवकर काम सुरु करु, असं फ्लिपकार्टकडून सांगण्यात आलं होतं, आता तीच मागणी फ्लिपकार्टने पूर्ण केली आहे.
काय आहे मनसे आणि अॅमेझॉन यांच्यातला वाद
अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर इतर भाषांसह मराठीचा समावेश व्हावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती, तशाप्रकारचे निवेदनही अॅमेझॉनला देण्यात आलं होत. यावर विचार करु आणि कळवू असं अॅमेझॉनकडूनदेखील कळवण्यात आलं होतं. मात्र अचानक अॅमेझॉनमध्ये मराठी भाषेचा समावेश करता येणार नाही, असं उत्तर आल्यानंतर मनसेने खळखट्याक करण्याचा निर्णय घेतला. मुंबईसह पुण्यातील अॅमेझॉनच्या कार्यालयात मनसेने तोडफोड केली.मनसेच्या भूमिकेविरुद्ध अॅमेझॉनने न्यायलयात धाव घेतली आहे. येत्या 5 जानेवारी 2021 रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायलयात हजर राहण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments