आपलं शहर

मुंबईतल्या मच्छीमारांची सागरी संवर्धनाकडे ओढ

मुंबईतल्या मच्छीमारांनी आता स्वतःच सागती संवर्धनाचा विडा उचलला आहे. तसाच महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील हजारो मच्छीमारांनीदेखील या संवर्धनासाठी काम करावं, असंदेखील मुंबईतील कारंजा फिशिंग कमिटीने म्हटलं आहे.

बहुतांश सागरी प्रजातींना वाचवण्यापासून ते बाल मासेमारीला आळा घालण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींवर या माध्यमातून विशेष लक्ष दिलं जाणार आहे. मासेमारी हा फार जुना व्यवसाय, छंद आहे. आदिमानवापासून अन्न मिळविण्यासाठी सुरू केलेली मच्छीमारी आता व्यवसाय बनला आहे. भाल्याने किंवा गळ टाकून मासे पकडऱ्या प्रकारांमध्ये मोठे बदल झाले आहेत.

सध्या पृथ्वीच्या भूभागावर 70.02 टक्के भाग समुद्राने म्हणजे खार्या पाण्याने वेढलेला आहे. या भागात पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर, तसेच या महासागरांचे उपसागर आणि दक्षिण, उत्तर ध्रुवांभोवतालचे सागर या सर्व जलाशयांचा समावेश होतो. यासगळ्यांमध्ये कॉड, हॅलिबट, हेरिंग, मॅकेरेल (बांगडा), सामन, तांबुसा, ट्यूना, गेदर, बोंबील, सरंगा (पापलेट), सावरी, बोय, सुरमई, मुशी (शार्क), देवमासे, कोळंबी, कालवे इ. मत्स्य वर्गातील आणि  इतर जलचर प्राण्यांची मासेमारी केली जाते. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेने जगातील सर्व मासेमारी करणाऱ्या प्रदेशांचे 27 भाग केले आहेत. त्यांतील सागरी मासेमारीचे 18 भाग आहेत.

सागरी अन्न साखळीवर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. मागील 55 वर्षांत 40 % माशांच्या प्रजतींचा नाश होत आलाय, अनेक माशांचा समुद्रातील 1000 मीटर खोलीवर संचार होत असतो, मात्र मच्छिमारी वाढल्याने अनेक माशांच्या प्रजती नाहीशा होत आल्या आहेत.

विशेषतः जागतिक स्तरावर 8% ते 25 % मासे फेकून दिले जातात. म्हणजे 27 दशलक्ष टन मासे दरवर्षी वाया जातात. याशिवाय ३ लाख व्हेल, डॉल्फिन, पोपोइसेससारखे हजारो मासे मासेमारी करताना जाळ्यात अडकून मरतात. तसेच सागरी कासवे व पक्षीही मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत.

व्हेल, ब्लूफिन ट्युना, डॉल्फिन, मोठा बांगडा यासारखे सागरी जीव समुद्रातून लुप्त होत आहेत. १९९०च्या सुरुवातीस अटलांटिक कॉडफिश कॅनडाच्या समुद्रात खूप होते. जागतिक निसर्ग संवर्धन आणि युरोपियन कमिशनच्या मते ७.५ टक्के युरोपियन सागरी क्षेत्रातील मासे नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. मुंबईतील मच्छिमारांनी संघटना एकत्र येऊन सागरी संवर्धन करण्याचा संकल्प करत आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments