आपलं शहर

बाप रे… मास्क नाही म्हणून दंड वसूल करणारी श्रीमंत पालिका झाली अजून श्रीमंत…

सध्या विनामास्क फिरणाऱ्यांवर राज्यातील सर्वच ठिकाणी कारवाई केली जात आहे. मात्र या सगळ्यात मुंबई महानगर पालिकेने धडाका लावला आहे. आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेने विनामास्क फिऱणाऱ्यांकडून तब्बल 16 कोटी 76 लाख 67 हजार 600 रुपयांचा दंड जमा केला आहे. (Mumbai Municipal Corporation imposed maximum fines, action on unmasked pedestrians)

कोरोना आणि लॉकडाऊनला घेऊन मुंबईमध्ये नियम कडक करण्यात आले आहेत. त्यात विनामास्क फिरणाऱ्यांना काही दिवसांआधी 1000 रुपये तर आता 200 रुपये दंड आकारला जातोय. त्यामुळे आधीच श्रीमंतीत गनना असलेल्या मुंबई पालिकेच्या उत्पन्नात आणखी एक घटकाची भर पडली आहे.

मुंबई पालिकेतीन 24 विभाग कार्यालयांच्या हद्दीत विनामास्क फिरणाऱ्या 8 लाख 20 हजार 167 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे 16 कोटी 76 लाख 67 हजार 600 रुपयांचा दंड पालिकेच्या तीजोरीत जमा झाली आहे.

ज्या विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पालिकेची कारवाई होते, त्यांना कारवाईनंतर मास्क मोफत दिला जातो. आणि मास्क दिल्याची नोंदही संबंधित दंड पावतीवर केली जाते.

14 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी एक बैठक घेतली. त्यानुसार विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले. त्यासाठी प्रत्येक प्रभागातल्या प्रशासकिय विभागात पथके नेमण्यात आली. या पथकांमध्ये पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधकसह विभागात कार्यरत असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या पथकांमध्ये काही प्रमाणात क्लीन-अप मार्शल यांचीही नियुक्त करण्यात आली आहे.

कोणत्या विभागात किती कारवाई:
झोन           व्यक्ती        दंड रुपये
झोन 1 – 1,16,765 – 2,39,23,500
झोन 2 – 1,50,572 – 3,04,45,700
झोन 3 – 1,06,737 – 2,26,32,400
झोन 4 – 1,26,334 – 2,58,16,200
झोन 5 – 93,918 – 1,90,00,300
झोन 6 – 1,11,538 – 2,23,51,000
झोन 7 – 1,14,312 – 2,34,98,500
एकूण – 8,20,167 – 16,76,67,600

(The rich corporation that collects fines for not having a mask has become even richer)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments