आपलं शहर

मुंबईचे डबेवाले करणार दुसरा व्यवसाय; 130 वर्षांनंतर डबेवाले करणार नवा प्रयोग… 

130 वर्षांची परंपरा आणि मुंबईची वेगळी ओळख असणारे मुंबईचे डबेवाले आता डिजिटल स्वरूपात एक नवीन व्यवसाय करणार आहेत. कोरोनाच्या काळात 7 महिने डबेवाल्यांची सेवा बंद होती, त्यामुळे त्यांचं आर्थिक कंबरडे मोडलं. अनेकजण इतरत्र व्यवसाय करू लागले तर काहीजण मिळेल ती नोकरी करू लागले आहेत, त्यामुळे आता डबेवाले संघटना आणि नाशिक व पुण्यातील शेतकरी एकत्र येऊन मुंबईत डिजिटल स्वरूपात मुंबईकरांच्या घरी भाजी पोहचवणार आहेत.

लॉकडाऊनच्या काळात मुंबईच्या डबेवाल्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी रेल्वे प्रवासाची परवानगी मिळाली परंततू सरकारी तसेच खासगी कार्यालयातील कामगार कपात, वर्क फ्रॉम होम, सोसायट्यांमध्ये प्रवेशास निर्बंध आणि बहुतांशी कामगारांच्या गेलेल्या नोकऱ्या यामुळे डबेवाल्यांच्या ग्राहक संख्येत कमालीची घट झाली आहे.

डबेवाले ज्या सोसायटीत डबे घ्यायला जातात अशा अनेक ठिकाणी निर्बंध असल्याने डबेवाले व्यवसायावर बेरोजगारीची वेळ आली आहे. यामुळेच डबेवाल्यांनी नाशिक पुणे आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी सामंजस्य करार करून एक नवीन संकल्पना अंमलात आणली आहे. शेतकऱ्यांकडून शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदी करून मुंबईकरांपर्यंत पोहचवण्याचे काम आता मुंबईकर डबेवाले करणार असल्याने, यासाठी मोबाईल ऍपचा देखील वापर होणार असून त्यासाठी नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असं डबेवाले संघटनांकडून आवाहन केलं जातं आहे.

डबेवाल्यांनी आतापर्यंत मुंबईकरांना योग्य अशी सेवा दिली आहे आणि आता ही या संकल्पपणेमुळे केवळ ग्राहकांचा नाही तर शेतकऱ्यांचा देखील फायदा होणार असल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

20201209 065701

अनलॉक प्रक्रियेत डबेवाल्यांना रेल्वेत प्रवासास मुभा नव्हती अखेर राज्यसरकारने रेल्वेतून प्रवासाला डबेवाल्यांना मुभा दिली, सतत सात महिने पडून असलेल्या आणि पावसाळी दिवस असल्यामुळे गंजून निकामी झालेल्या सायकल दुरुस्त करणे अथवा नविन खरेदी करणे तसेच कोरोनाच्या प्रादूर्भावातून डबेवाले कामगार तसेच ग्राहकांना सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करून ही ग्राहकांना वर्गाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आजच्या स्थितीला ५००० डबेवाल्यांपैकी केवळ ४५० डबेवाले प्रत्येकी केवळ ५ ते ६ डबे पोहोच करत आहेत.

डबेवाल्यांनी आतापर्यत जवळपास 130 वर्ष मुंबईकरांना सेवा देत असताना कोरोनाने घाव घातला आणि अनेक कुटुंब उध्वस्त झाली. यातून बाहेर येण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न असावा आणि अनेक कुटुंब यातून उभी रहावीत अशा भावना व्यक्त करत आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments