खूप काही

ऑनलाईन शिक्षणाचा फंडा चर्चेचा मुद्दा; ‘कुठे खुशी, कुठे गम

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. जगभरात ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भर दिला जात आहे.  या काळात अनेक ग्रंथालयांची प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. विशेष म्हणजे  ई-लायब्ररी, ई-पुस्तके विद्यार्थ्यांना  उपलब्ध करुन दिली जात आहेत.

काही बाबतीत शिक्षक ऑनलाईन पुस्तके किंवा नोट्स शेअर करत असतात. परीक्षेपूर्वी अनेक संदर्भांसाठी महाविद्यालयिन ग्रंथालयांची मदत गरजेची असतेच, म्हणून विध्यार्थी वर्गाला ई-लायब्री उपलब्ध जात आहे. मागील काही वर्षांमध्ये अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना, कर्मचार्‍यांना पुस्तके सहज उपलब्ध करुन देण्यासाठी आपली ई-लायब्ररी तयार केली आहे. त्यामुळे त्याचा कोरोनाकाळात फायदा होताना दिसत आहे.

वास्तविक वर्गांपेक्षा संगणक-आधारित किंवा ऑनलाईन शिक्षणामुळे जाणवून आलेले फायदे –

● प्रति क्रेडिट तास कमी होतात (वाया जाणार वेळ वाचतो)

● डिजिटल प्रणालीने शिकण्यास मदत होते

● पुस्तकांपेक्षा विद्यार्थ्यांचे डिजिटल शिक्षणाकडे आकर्षण जास्त आहे.

●  एका ठराविक इमारतीत जाण्यापेक्षा कुठूनही शीकवता येतं आणि शिकवता येतं.

●शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार शिकवणी घेतली जाते, वेळेनुसार ज्यादा वेळही शिकवला जातो.

●वेबकास्ट किंवा इतर कोर्स मटेरियलचा वापर केला जाऊ शकतो.

पोदार महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सोभना वासुदेवन म्हणतात की “आमचे ऑनलाईन वर्ग सुलभतेने चालू आहेत आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुलभतेसाठी ई-बुक आवृत्तीत सर्व आवश्यक पुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत,कोणत्याही पुस्तकाची ई-आवृत्ती उपलब्ध नसल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची खात्री घेऊन शिक्षक नोट्सही पुरवत असतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments