आपलं शहर

रात्रीच्या वेळी मुंबईच्या गुन्हेगारीला पोलिसांचा जबर चाप ; “ऑपरेशन ऑल आऊट” राबवून 33 फरार आरोपींसह 10 तडीपार आरोपींना बेड्या

वर्षसरती आणि नवं वर्ष स्वागतासाठी मुंबईत होणारी गर्दी आणि कोरोना खबरदारीसाठी रात्रीची संचारबंदी करण्यात आली. या संचारबंदीसह शहरात होणारी गुन्हेगारी आणि बेकायदा कारवायांविरोधात मुंबई पोलिसांनी विशेष प्लॅन ऑलआउट ऑपरेशन आखले. रात्री होत असलेल्या गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी बुधवार (23 डिसेंबर) रोजी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले.

मुंबई शहर हे जितके सुंदर तितकेच गुन्हेगारीच्या जाळ्यांनी पसरलेले. यावर वर्ष सरतीच्या होणाऱ्या पार्ट्यांमध्ये यांची प्रचिती अधिक येते. यावर्षी हे चित्र नसणार याचा आनंद असला तरी इतर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ऑलआउट ऑपरेशन राबविण्यात आले आणि ऑपरेशनला चांगल्या प्रकारे यश आले. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनात्व आणि कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन सफल झाले. यामध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करणे, गस्त घालणे, हॉटेलांची झडती तसेच वस्त्यांमधील तपासणी यांसारखे ऑपरेशन सुरू केले गेले.

या ऑपरेशनच्या माध्यमांतून पोलिसांनी अभिलेखावरील तसेच फरारी गुन्हेगारांसह अनेक तडीपार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. फक्त 3 तासांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑलआउट ऑपरेशनअंतर्गत 715 हॉटेल, लॉज आणि मुसाफिर खान्याची झाडाझडती घेतली.

एव्हढेच नव्हे तर 112 ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत 7 हजार 426 वाहनांची तपासणी केली गेली. मुख्य म्हणजे या ऑपरेशनच्या माध्यमांतून 33 फरार आरोपी आणि जवळपास 10 तडिपारांना बेड्या ठोकल्या आहेत. ड्रग्ज संबंधित देखील 9 कारवाया करण्यात आल्या. तसेच या ऑपरेशनदरम्यान 14 अवैध शस्त्रे पाेलिसांनी जप्त केली.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments