खूप काही

भर हिवाळ्यात मुंबईसह राज्यात पावसाची हजेरी; नेमका अजून किती दिवस पडणार पाऊस

मुंबई आणि लगतच्या उपनगरांसह राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. अनेक ठिकाणी पावासाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईतील काही ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत.

9 डिसेंबरपासून मुंबई उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण आहे. आरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह आसपासच्या उपनगरात ढगाळ वातावरणासह पाऊस येत असल्याची माहिती हवामान खात्याने  दिली आहे. मुंबईतील परळ, सायन, सांताक्रूझ, अंधेरी, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, वसई विरार भागात पावसाच्या हलक्या सारी सुरु आहेत.

येत्या दोन-तीन दिवसात कोकणात तसेच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये  पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

आभाळ पूर्णपणे भरलेलं असून हवेत प्रचंड गारवा पसरला आहे. भिवंडीतही पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. मंडई बाजार पेठेत सकाळीपासून पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे चिखल झाला आहे. खरंतर, या अवकाळी रिमझिम पावसाने साथीचे आजार बळावण्याची शक्यता वाढली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments