आपलं शहर

मुंबईत पुन्हा रात्रीचा कडक लॉकडाऊन; पहा का आणि कुठे?

मुंबईत कोरोनाचा धोका कायम असतानाही अनेक नाईट क्लब, हॉटेल इत्यादींकडून  अनेक नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे 25, 30 डिसेंबर आणि एक जानेवारीला रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय जवळपास नक्की झाला असल्याचे बीएमसीकडून सांगितले जात आहे. त्यासाठी मार्गदर्शक नियमावली बनविण्यात आली असून आणखी दोन ते तीन दिवस वाट पाहून रविवारी किंवा सोमवारी ही नियमावली जाहीर केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबईत सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे दुसरी लाट कोणत्याही क्षणी येऊ शकते, असा इशारा वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे. त्यानंतरही मुंबईतील पब, हॉटेल क्लबकडून कोरोना संदर्भातील मार्गदर्शन तत्त्वांचे पालन केले जात नाही त्याचबरोबर हॉटेलमधील क्षमतेनपेक्षा निम्म्या लोकांची अट, तसेच रात्री अकरापर्यंत सर्व हॉटेल्स, बार, पब बंद करणे बंधनकारक असतानाही या  नियमांचे उल्लंघन केले जात आहेत.

पालिकेकडे तक्रारी आल्यानंतर गेल्या शनिवारी रात्री बारा वाजता लोअर परेलच्या नाईट क्लब मध्ये सुमारे दोन हजार नागरिक तसेच सोमवारी वांद्रे येथील बॉम्बे अड्डा आणि हॉटेलमध्ये 275  जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.

इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र आल्याने कोरोना रुग्ण संख्या वाढू शकते याची गंभीर दखल घेऊन पालिकेने ही बाब राज्य सरकारला पत्र पाठवून निदर्शनास आणून दिली आहे. नाताळ 31 डिसेंबर आणि एक जानेवारीला पुन्हा असे प्रकार घडू शकतात ही बाब लक्षात घेऊन पालिकेने या तीनही दिवशी रात्री 11 ते पहाटे 4 या वेळेत संचारबंदी लावण्याचा विचार सुरू केला आहे. हॉटेल बरोबरच मरीन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, चौपाटी या सर्व ठिकाणी निर्बंध घालण्याची शक्यता आहे. त्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत वाट पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

मुंबईत कोरोना स्थिती नियंत्रणात व समाधानकारक आहे मात्र हॉटेलमधून होत असलेला विना मास्क आणि न पाळले जाणारे अंतर धक्कादायक आहे. या बेजबाबदारपणामुळे संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे 20 डिसेंबरपर्यंत सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. – सुरेश काकांणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments