खूप काही

कोरोनाच्या संसर्गातून तरुण वर्गाची सुटका, मृत्यूदर झाला कमी

मुंबई आणि आसपासच्या महानगरातून तरुण वर्गाला कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत होते. वयोगट 25 ते 35 मधील तरुण वर्गाचा यामध्ये समावेश जास्त होता.

मात्र आता आरोग्य विभागाने दिलासादायक बातमी दिली आहे. ती म्हणजे मुंबईतील तरुणांवर होणारा कोरोनाचा परिणाम कमी झाला आहे.

11 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर या दरम्यान कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होत आहेत, काही काळापूर्वी तरुणांचा मृत्यू दर 2.5% इतका होता, तर 11 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर या दरम्यान फक्त कोरोनामुळे तरुणांचा मृत्यू1दर 0.45 % वर आला.

मुंबईत या काळात तरुणांच्या  मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. तरुणांनमध्ये प्रतिकारशक्ती जितकी जास्त तितके ते निरोगी राहतील, असे असले तरी नॉन सिम्पटोमॅटिक कोरोनाची लक्षणे तरुणांमध्ये दिसून आली होती. आता ही लक्षणे कमी झाल्याचे समोर येत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments