आपलं शहर

मुंबई लोकल सुरू होण्यासाठी उरले फक्त काहीच दिवस, असं असेल सगळं मॅनेजमेंट…

विधान भवनात आलेल्या मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्रकारांनी मुंबई लोकलबद्दल प्रश्न विचारला, त्यावर विजय वडेट्टीवर यांनी दिलेली माहिती खूप सुचक आहे.

मुंबईतल्या लोकल ट्रेन्स सर्वसामान्यांना जानेवारी 2021 मध्ये सुरू होती तसा विचारही राज्य सरकारने केला आहे, सध्या मुंबईतील कोरोनाची परिस्थिती निवळली असल्याने लोकल सुरू करण्यास काहीच हरकत नाही, असं सूचक वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलय.

मुंबई लोकलचा प्रवास सर्व लोकांसाठी कशापद्धतीने सुरळीत आणि सुरक्षित असेल, यावर राज्य सरकारने पूर्ण विचार केला आहे. सोबत तिकीट खिडकीवर गर्दी होऊ नये, यासाठी एका नव्या ऍप्लिकेशनची तयारीही राज्य सरकार करत असल्याचे वडेट्टीवार यांनी याआधी स्पष्ट केले होते, कशाप्रकारे कामदेखील राज्य सरकारचे सुरू आहे. सोबतच मुंबई लोकल सर्वसामान्यांना सुरू करण्याचा विनंती अर्जही राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. केंद्राकडून उत्तर येताच लोकल सुरू करण्याचा निर्णय लवकर घेऊ, अस विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

  • राज्य सरकारने केंद्राकडे सादर केलेल्या पत्रानुसार लोकलच्या प्रवासासाठी प्राथमिक नियमावली
  • पासधारकांना सकाळी पहिल्या ते सकाळी 7.30 वाजेपर्यंत प्रवास करण्याची मुभा
  • अत्यावशक सुविधेत सामील असलेल्यांना सकाळी 8 ते 10.30 या काळात प्रवास करण्याची मुभा
  • सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4.30 पर्यंत सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी परवानगी
  • संध्याकाळी 5 ते 7.30 पर्यंत फक्त अत्यावश्यक सुविधेत काम करणाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा
  • रात्री 8 वाजल्यानंतर पुन्हा सर्वसामान्यांसाठी लोकलने प्रवास करण्याची परवानगी

याआधी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मान्य केलं होतं की मुंबईतील लोकसंख्या आणि प्रवासी संख्या लक्षात घेता फिजिकल डिस्टनसिंग पाळणे कसरीची गोष्ट असणार आहे, मात्र मुंबईकरांना हे नियम पाळावेच लागतील. प्रत्येक ऑफिसच्या वेळा बदलाव्या लागतील, अनावश्यक प्रवास टाळावा लागेल, असे अनेक बंधनकारक नियम आपल्याला लावावे लागतील, जेणेकरून मुंबईच्या लोकल सुरू होताच कोरोनाचा प्रसार वाढणार नाही. दीड हजार ते सतराशे प्रवासी मर्यादा असलेल्या लोकलमधून कोरोनाच्या आधी साडेचार हजारहून अधिक जण प्रवास करत होते, मात्र आता ते शक्य नसल्याचे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments