कारण

“तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करू” शिवसेनेत येताच उर्मीलांची झणझणीत सुरुवात

राज्यात पक्षांतरांचे अफाट किस्से रंगत असतानाच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभेच्या निवडणुकांवेळी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढणार्या उर्मिला आता शिवसेनेतून विधान परिषदेवर जाणार आहेत. विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत उर्मिला यांचं नाव आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी हे ट्विट खासकरून शिवसेनेच्या विरोधकांना आणि ट्रोलर्ससाठी केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना राणावत विरुद्ध शिवसेना असे वाद रंगले होते. शिवसेनेकडून कोणतीच महिला अभिनेत्री कंगनाला विरोध करण्यासाठी नव्हती, मात्र आता उर्मिला यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यांनंतर खासकरून भाजपला धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

“तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करू, हे गाणं मला खुप आवडतं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं,” असा प्रश्न तिने तिच्या चाहत्यांसोबतच तिला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सलादेखील विचारला आहे.

दिनांक 1 डिसेंबररोजी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांना पत्रकार परिषदेत ट्रोलर्सबद्दल विचारण्यात आले होते. त्यावरही ट्रोलर्स जितके ट्रोल करतील, तितक माझ्यासाठी योग्य आहे, मी अजून पुढे जात राहीन, ज्यांना माझ्याबद्दल वाईट वाटतं, त्यांच्यासाठी मी काहीच करू शकत नाही, असही उर्मिला म्हणाल्या.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments