आपलं शहर

मुंबईत असे असणार लसीचे वितरण, पहा त्यासाठी कुठे करावी लागणार तुम्हाला नोंदणी !

[et_pb_section admin_label=”section”] [et_pb_row admin_label=”row”] [et_pb_column type=”4_4″][et_pb_text admin_label=”Text”]कोरोनाचे संकट ओढावल्यापासून ज्या बातमीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती बातमी अखेर वर्ष शेवटी आली आहे. कोरोनावरती उपाय म्हणून लस उपलब्ध झाली आहे.आता देशात आणि मुंबईत जरी लस देण्यास सुरूवात झाली नसली तरी रशिया, युके आणि अमेरिकेत आता कोरोनाची लस द्यायला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरचं आपल्याकडे देखील लस देण्यास सुरुवात होणार आहे.                                 

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाने धुमाकूळ घातला होता, आता लस आपल्या भारतात द्यायला सुरुवात झाली नसली तरी त्याचे वितरण कसे केले जाईल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मुंबईत देखील लसीकरणासाठी जोरदार तयारी सुरू झालेली आहे. लसीकरणासाठी तीन प्रकारचे गट पाडण्यात आले आहेत.

त्यानुसार पहिल्या गटात शासकीय आणि खाजगी सेवेतील आरोग्य कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी येतात. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी त्याचे नऊ गटात वर्गीकरण करण्यात येणार आहे. दुसऱ्या गटात आपल्या राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक, महानगरपालिका कर्मचारी अश्या फ्रंट लाईन वर्करचा समावेश आहे. तिसऱ्या गटात 50 वर्षावरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अश्या 50 वर्षाखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. एकूणच, सदर पडलेल्या तीन गटात मोडणाऱ्यांना प्रथम लसीचे प्राधान्य दिले जाईल.

कशी करणार कोरोना वॅक्सिंगसाठी नोंदणी ?

देशभरासह मुंबईत लसीकरणाच्या वितरणाची नोंद ही मतदार नोंदणीच्या आधारे केली जाईल. यामधून विविध वयोगटातील नागरिक शोधून कोविन ( Covin ) म्हणजे कोविड वॅक्सिंग इंटेलिजन्स नेटवर्क ( Covid Vaccine Intelligence Network ) या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती केली जाईल. मुख्य म्हणजे नोंदणी केलेल्या लोकांनाचं लस दिली जाणार आहे. प्रतिदिवशी 100 ते 200 लोकांना लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला अर्धा तास तिथेच डॉक्टरांच्या निगराणी खाली बसावं लागणार आहे, तसेच एका वेळी एकाच व्यक्तीला लस टोचावी अश्या सूचना केंद्राकडून दिल्या गेल्या आहेत.

मुंबईत लसीकरणासाठी एक वेगळा टास्क फोर्स

कोरोनाने आपला फैलाव वाढवलेल्या मुंबईत लसीकरणाच्या वाटपासाठी एक वेगळा टास्क फोर्स उभारला गेला आहे. 5 जणांसाठी एक अशी मुंबईत लसीकरणासाठी 500 पथके नेमण्यात आल्याची माहिती टास्क फोर्सचे प्रमुख आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली आहे. ज्या लोकांचे लसीकरण होईल त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती मेसेज केला जाईल. यासगळ्या साठी एक व्यवस्था प्रणाली सुद्धा स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे कांजूरमार्गमध्ये एक सुमारे 5 हजार चौरस फुटाच एक प्रादेशिक लस भांडार (Regional Vaccine Store) म्हणून एक जागा निर्देशित करण्यात आली आहे.

कोणत्या इन्स्टिट्यूटच्या लसी मिळू शकतात ?

2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात लसीची साठवणूक केली जाईल अश्या प्रकारची कोल्ड स्टोरेज भारतात मोठ्या प्रमाणात उभे केले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने

● सिरमची कोविशिल्ड ( Serum Institute – Covishlied )
● भारत बायोटेकची कोव्याक्सिन ( Bharat Bayotek – Co-vaccine )
● झायड्स कॅडेलाची झायकोव डी ( Zydus Cadila – ZyCov-D ) आणि
● रशियाची स्फुटणीक फाय ( Russia – Sputnik V)

या चार लशी भारतात उपलब्ध होऊ शकतात कारण यांना साजेसे 2 ते 8 डिग्री तापमान सुयोग्य आहे. फायझरच्या आणि मॉडरणाच्या लसी साठवण्यासाठी अत्यंत थंड तापमानाची गरज आहे. त्यामुळे त्या आपल्या भारतात येण्यासाठी पुढील सहा महिने जातील अशी मते संशोधक सांगतात.

 [/et_pb_text][/et_pb_column] [/et_pb_row] [/et_pb_section]

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments