आपलं शहर

22 डिसेंबर रोजी मुंबईत पाणी कपात, अनेक ठिकाणी पूर्णतः पाणी बंद

मुंबईवर कधीही पाण्याचे संकट आले नसले तरी मात्र संपूर्ण मुंबईकरांना एक दिवसाची पाणी टंचाई भोगावी लागणार आहे. जलशुद्धीकरण यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी ही पाणी कपात करण्यात येणार आहे. आग्रा रोड व्हॉल्व संकुल ते पोगाव दरम्यानच्या जलशुद्धीकरण यंत्रणेची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

घाटकोपरच्या जलाशयची मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्याच्या कामामुळे 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 24 तासांसाठी 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तर घाटकोपर आणि कुर्ला येथील एन व एल विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णतः बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

हे काम मंगळवार, दिनांक 22 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजेपासून बुधवार, दिनांक 23 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. या कामामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्यामध्ये 15 टक्के कपात करण्यात येणार आहे. तर एन आणि एल विभागातील काही भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद करण्यात येणार आहे.

मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला मदत करावीस असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. तर घाटकोपर उच्चस्तर जलाशयातील पाणीपुरवठा करणाऱ्या 1400 मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील झडप बसविण्यचे काम या काळात होणार आहे. कुर्ला आणि घाटकोपरमधील काही भाग वगळता उर्वरित मुंबईत 15 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments