आपलं शहर

थर्टी फर्स्ट पार्टीला परवानगी की लागणार संचारबंदी ? पहा काय सांगतात मुंबई महापालिका आयुक्त

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट जरी कमी झाले असले तरी मुंबईत कोरोनाचे संकट मुळापासून संपलेले नाही. सरकारने नागरिकांना सण उत्सव साजरे करण्यास अटी शर्थींवर परवानगी दिली, पण एकूणच कोरोनाची आकडेवारी पाहता नागरिकांकडून नियमांचे पालन केले नसल्याचे समजले. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा असे आवाहन असताना, बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळाली. आणि अर्थातच याचा परिणाम झाला कोरोना रुग्ण संख्येच्या आकडेवारीवर. सप्टेंबर महिन्यानंतर मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या आढळल्या. यावेळी वाढत्या रुग्णसंख्येवरून कोरोनाची दुसरी लाट येऊन गेल्याचे देखील म्हंटले गेले.

आता कोरोना रुग्णांची संख्या जरी आटोक्यात येत असली तरी मुंबईत अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. म्हणून खबरदारी म्हणून सरसकट सर्वांसाठी लोकल सुरू करण्याची परवानगी देखील नाकारण्यात आली आहे. नाताळ आणि वर्षशेवटीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी लोकल संदर्भातील निर्णय घेण्यात आला.

सण साजरे करण्यासाठी लोक बाहेर पडून गर्दी करत असतील तर, 20 डिसेंबर नंतर रात्री 11 ते सकाळी 6 यावेळेत मुंबईत संचारबंदी लागू करण्यात येईल असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिला आहे. कोरोनाचा धोका अजूनही पूर्णतः संपला नाही, तरीही अनेक ठिकाणच्या नाईट क्लब्जकडून सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन केल्याचे दिसून येत नाही. आणि आता 25 आणि 31 डिसेंबरला नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक क्लब्जकडून पार्ट्यांचे आयोजन केले जाऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू शकते. अश्या वेळेस लोक एकत्र येऊ शकतात, सुरक्षित अंतराचे पालन करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे वीस डिसेंबर पर्यंत हे चित्र बदलताना दिसले नाही तर मुंबईत संचारबंदी लागू केली जाईल, असे आयुक्त चहल यांनी सांगितले.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments