आपलं शहर

1 मास्क 1 महिन्यासाठी; मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी मिळणार शाळेतून मास्क

मुंबई शहरातील कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, शाळा सुरु होण्याआधीच 75 लाख मास्कची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक वादांना तोंड फुटल्याचं पाहायला मिळत आहे.

सद्यपरिस्थितीत मुंबईत पालिकेतील शाळांमध्ये 2 लाख 96 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सुरु झाल्यावर शाळेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. याकरिता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत, त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी पहिल्या टप्प्यात 75 लाख मास्कची खरेदी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती आणि कोरोनामुळे बिघडलेली आर्थिक स्थिती पाहता अनेक पालकांना विद्यार्थ्यांसाठी सोई उपलब्ध करुन देणे अवघड होत असते, याचाच विचार करुन शाळा सुरु झाल्यावर मुलांना मास्क उपलब्ध करुन देण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे.

एकूण २० कोटी रुपयांच्या मास्कची खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. एक मास्क ३० दिवस धुवून वापरता येऊ शकते. असे 25 मास्क एका विद्यार्थ्याला देण्यात येणार आहेत, जेणेकरून 2 वर्षे ते मास्क विद्यार्थी वापरु शकतील.

आगामी दोन वर्षासाठी पालिकेकडून 75 लाख मास्कची खरेदी केली जाणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी लस उपलब्ध झाल्यानंतरही पुढील सहा महिने मास्क वापरावा लागेल, असे सांगितले होते. त्याचीच तयारी बीएमसी करत आहे, मात्र त्याचा अर्थ इतक्या जास्त मास्कची खरेदी करणे असा होत नाही, कंत्राटदारांचे भले करण्यासाठी फक्त पालिका हा निर्णय घेत असल्याचं मत मुंबई पालिकेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी मांडलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments