खूप काही

पालिकेमध्ये पावणे 5 कोटींचा घोटाळा, सेवानिवृत्त अधिकाऱ्याची सही करून पालिकेला फसवले

सध्याच पुणे महानगरपालिकेत पावणे पाच कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. पालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या अतिवरीष्ठ अधिकारी संदीप खांदवे यांची सही करून हा गंडा घातल्याचं उघड झाले आहे. (5 crore scam in the corporation, cheated the corporation by signing a retired officer)

पालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकारी यांची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रुपये अदा करण्यात आल्याचा गंभीर गैरप्रकार उघडकीस पालिकेच्या मलनिस्सारण विभागातून उघड झाला आहे.

पालिकेतील काही पदाधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केल्याचं म्हटल जातं आहे. पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प विभागामध्ये हा घोटाळा झाला आहे, या विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता संदीप खांदवे 31 ऑगस्ट 2019 रोजी सेवानिवृत्त झाले,  त्यानंतर त्या पदावर कार्यकारी अभियंता सुष्मिता शिर्के यांनी अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.

पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी संगनमताने आंधळे यांची बनावट स्वाक्षरी करून पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ठेकेदाराला 4 कोटी 88 लाख 24 हजार 505 रुपयांचे बिल परस्पर देऊन टाकल्याचा प्रकार आता समोर आला आहे, यावर पालिकेकडून कोणती कारवाई केली जाते, हे पाहणे गरजेचे आहे. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments