आपलं शहर

१७ जानेवारीपासून ‘स्टॅचू ऑफ युनिटी’साठी मुंबईहून धावणार विशेष गाडी

भारतातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी व संपूर्ण विश्वातील सगळ्यात जास्त उंची असणाऱ्या गुजरात येथील वडोदरा स्थित ‘ स्टॅचू ऑफ युनिटी ‘ कडे सगळ्यांचे लक्ष वेधण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून एक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.

१७ जानेवारीपासून पश्चिम रेल्वे (डब्ल्यूआर) मुंबई ते केवडिया दरम्यान थेट एक विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. जिथे उतरल्यावर पर्यटकांना ‘स्टॅचू ऑफ युनिटी’ पाहण्यासाठी जास्त दूर जावे लागणार नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ जगातील सर्वात ऊंच स्मारक अशी त्याची ओळख आहे. पश्चिम रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “वडोदरापर्यंत धावणारी ट्रेन क्रमांक १२९२७/२८  सुपरफास्ट एक्सप्रेस केवडिया स्थानकापर्यंत धावणार असून आता ती गाडी क्रमांक ०२९२७/२८ दादर-केवडिया सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून चालविली जाईल.”

नियमित धावणारी ट्रेन क्र.०२९२७ दादर-केवडिया सुपरफास्ट एक्सप्रेस १७ जानेवारीपासून दररोज रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी दादर स्थानकातून सुटेल व दुसर्‍या दिवशी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी केवडिया येथे पोहोचेल.तसेच ट्रेन क्रमांक ०२९२८ केवडिया-दादर सुपरफास्ट एक्सप्रेस केवडीया येथून दररोज रात्री 9 वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी दादरला पोहोचेल.

ही गाडी वलसाड,सूरत,भरुच आणि वडोदरा जंक्शन, दोन्ही दिशेने थांबेल.तसेच विश्वामित्रि स्टेशनवर देखील या गाडीला थांबा आहे. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी 2-टियर, एसी 3-टियर, स्लीपर क्लास आणि द्वितीय श्रेणी अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.१

७ जानेवारी रोजी उद्घानप्रसंगी सकाळी ११.१२ वाजता दादरहून ही ट्रेन सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी केवडिया येथे पोहोचेल.या गाडीबद्दल जास्तीत जास्त माहिती पश्चिम रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments