खूप काही

राजकीय तांडवात अडकलेली वेब सीरिज

नुकतीच ‘ॲमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झालेली ‘तांडव’ ही वेब सीरिज अधिकाधिक वादात अडकताना दिसत आहे. सीरिज रिलीज होताच त्यावर आक्षेप घेण्यास सुरुवात झाली आहे, सोबतच सीरिजवर बंदी घालण्याची मागणीदेखील अनेक ठिकाणांहून केली जात आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे, या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेले काही प्रसंग. यातील काही सीनमधून ‘हिंदू’ संस्कृतीचा अवमान होत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.

तांडवच्या पहिल्याच भागात लक्षात येतं की या संपूर्ण सीरिजमध्ये नेमकं काय दाखवलं जाणार आहे आणि हेही लक्षात येतं की या सीरिजमध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण करण्याची क्षमता आहे. मात्र नंतर तीच कॉन्ट्रोव्हर्सी खूपच वाढलेल्याचं दिसून येत आहे.

हल्ली एखाद्या चित्रपटाच्या नावामुळेच आपल्या भावना दुखावल्या जातात, चित्रपटातील एखाद्या सीनमुळे भावना दुखावल्या जातात किंवा एखाद्या कॉमेडी ॲक्टमुळे आपल्या भावना दुखावल्या जातात. हे सध्या आपल्या देशात चालू आहे. लॉजिकली किंवा खरंच ज्या गोष्टी भारताला गरजेच्या आहेत त्या राहिल्या बाजूला, आपण या इतर गोष्टींवरच खुप फोकस करतोय, असं दिसून येतय, काहीदा वृत्तवाहिन्यादेखील सगळ्या विषयांना घेऊन ‘प्राईम टाईम’मध्ये चर्चा करत असते. अर्थात त्यातून काही निष्पन्न होत नाही ही वेगळी गोष्ट! असो, आपण पुन्हा ‘तांडव’कडे वळुयात.

नेमका कोणत्या सीनमुळे वाद झालाय?
पहिला सीन
वास्तविक पाहता, ‘तांडव’ या वेब सीरिजमध्ये काही सीन्स दाखवले गेले आहेत, ज्यामध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. मालिकेच्या पहिल्या भागातील एका दृश्यात अभिनेता जीशान अयूब, भगवान शंकरांशी मिळत्याजुळत्या वेशात दिसून येत आहे. त्याच्या हातात त्रिशूळ आणि गळ्यात रुद्राक्षांची माळ आहे. मात्र, या सीनमध्ये अभिनेत्याने कोट-पँट परिधान केला आहे. भगवान शिव म्हणून अभिनेता म्हणतो- ‘शेवटी, तुला कोणापासून स्वातंत्र्य पाहिजे आहे?’ तेव्हाच नारद मुनीची भूमिका साकारणारा कलाकार समोर येतो आणि म्हणतो “नारायण-नारायण. प्रभू काहीतरी करा. रामजींचे अनुयायी सोशल मीडियावर सतत वाढत असतात.’

दुसरा सीन
वेब सीरीजमध्ये असे दखवले गेले आहे की एक कथित दलित मंत्री एका कथित उच्चवर्गीय महिलेला डेट करतो. या संदर्भात वेब सीरिजमध्ये दोनदा वादग्रस्त विधान आहे ते म्हणजे “जेव्हा निम्न जातीचा माणूस उच्च जातीच्या स्त्रीला डेट करतो तेव्हा तो सूड घेत असतो, त्या एका स्त्रीकडून सूड घेत असतो.” लोकांनी या विधानावरही आक्षेप घेतला आहे.

तसंच, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विषयीही काही आक्षेपार्ह विधानं यात करण्यात आली आहेत. त्यांच्याशी जोडलेल्या वाक्यांमधे एक दोन शिव्यादेखील वापरल्या गेल्या आहेत.

‘आवडत नसेल तर नका बघू’
मागे सर्वोच्च न्यायालयाने अर्नब गोस्वामींच्या बाबतीत एक निर्णय दिला होता, तो असा की, ‘जर तुम्हाला त्यांचं चॅनल आवडत नसेल तर नका बघू.’ तांडवच्या बाबतीतदेखील हे लागू होऊ शकतं, ‘तुम्हाला जर ती सीरिज आवडत नसेल, तर नका बघू.’ पण याचा अर्थ असाही नाही की त्यामध्ये एखाद्या संस्कृतीची केलेली गळाचेपी आम्हाला मान्य आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments