फेमसखूप काही

नवऱ्याच्या एका स्वप्नामुळे बायको झाली तब्बल ४३७ करोडची मालकीण !

कोरोना काळात ज्या महिलेला कंपनीने कामावरून काढून टाकले, तिच महिला थोड्याच दिवसात तब्बल ४३७ करोडची मालकीण बनली. कॅनडामधील टोरंटो शहरात राहणाऱ्या एका महिलेला लॉटरी लागली आणि त्यात तिला ६० मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजेच भारतीय ४३७ करोड रुपये मिळाले. पण त्या महिलेच्या पतीने जर ते स्वप्न पाहिलेच नसते तर मात्र महिलेला या संधीला मुकावे लागले असते. तिच्या पतीच्या स्वप्नाचा आणि महिलेच्या लॉटरी जिंकण्याचा नेमका संबंध काय, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. चला, जाणून घेऊया.

सीएनएन ने दिलेल्या माहितीप्रमाणे, डेंग प्रवतुडोम (वय ५७) यांच्या पतीने जवळपास २० वर्षा पूर्वी एक स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नात त्यांनी लॉटरीचे काही खास अंक बघितले. तेच आकडे त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले आणि त्याच आकड्यांमुळे आज डेंग एवढी मोठी लॉटरी जिंकू शकल्या.

दोन मुलांची आई असलेल्या डेंग म्हणतात, त्यांनी प्रत्येक वेळी तेच तिकीट खरेदी केलं ज्यावर त्यांच्या नवर्याच्या स्वप्नात आलेला नंबर होता. मागील २० वर्षांपासून त्या लॉटरीचे तिकीट खरेदी करायच्या. शेवटी २० वर्षाच्या प्रयत्नानंतर डेंग यांना यश मिळालं. कॅनडाच्या ओंटारिओ लॉटरी आणि गेमिंग ने डेंग यांना लागलेल्या लॉटरीची बातमी खरी असल्याचे म्हटले आहे.

डेंग म्हणतात,”४३७ करोड जिंकल्याची बातमी ऐकून मी बेशुद्ध झाले होते आणि मला रडू सुद्धा येत होते. माझा विश्वासच बसत नव्हता की मी खरच एवढी मोठी रक्कम जिंकली आहे.” डेंग यांना ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे त्यांनी जिंकलेल्या रकमेचा चेक दिला गेला. डेंग या जिंकलेल्या रकमेने एक नवीन घर खरेदी करणार आहेत. तसेच त्या पैशांनी त्यांना संपूर्ण जग फिरायचं आहे. डेंग या ४० वर्षांपूर्वी आपल्या १४ भावा बहिणींसोबत अमेरिकेहून कॅनडाला आल्या होत्या. त्यावेळेस त्यांना घर चालवण्यासाठी खूप मेहनत करावी लागत असे. परंतु आता त्यांचे दिवस बदलल्याने त्या आनंदी आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments