आपलं शहर

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली…

नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी मुंबईत अनेक ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक अतिवाईट स्तरावर घसरला. नवीन वर्षांचा पहिलाच दिवस ढगाळ हवा आणि प्रदूषणास तोंड द्यावे लागले. दिवसभरात सर्वच ठिकाणी प्रदूषक घटकांचे प्रमाण वाढल्याने गुणवत्ता निर्देशांकात घसरण झाली. शहर आणि उपगनरात सफर (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अॅण्ड वेदर फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्च) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांची एकूण 19 ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजणारी संयंत्रे आहेत.

यापैकी आठ ठिकाणी वाईट, पाच ठिकाणी अतिवाईट आणि केवळ सहा ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम पातळीवर असल्याची नोंद झाली. सर्वाधिक हवा प्रदूषण वांद्रे-कुर्ला संकुलात आढळले. दोन्ही यंत्रणांच्या नोंदीनुसार वांद्रे-कुर्ला संकुल, मालाड, माझगाव, चेंबूर आणि कुर्ला या ठिकाणी हवेची गुणवत्ता अतिवाईट स्तरावर (प्रदूषत घटक 301 ते 400) पोहचला.

प्रदूषक घटक 2.5 चे सर्वाधिक प्रमाण हे वांद्रे-कुर्ला संकुलात 358 नोंदविण्यात आले. वरळी, अंधेरी, बोरिवली, आंतराष्ट्रीय विमानतळ, कांदिवली, मुलुंड, पवई आणि शीव या ठिकाणी हवेची पातळी वाईट स्तरावर (प्रदूषक घटक 200 ते 300) नोंदविण्यात आली. थंडीच्या काळात कोरडे वारे आणि ढगाळ हवेमुळे गुणवत्ता निर्देशांक घसरण्यात भर पडली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments