खूप काहीफेमस

Love at First Site : अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांची गाजलेली प्रेम कहाणी

अमेरिकेतील राजकारणात इतिहास रचणारी कमला हॅरिस आज दुनियातील महिलांसाठी प्रेरणा बनली आहे. कमला हॅरिसच्या या यशात तिचे पती डगलस एम्हॉफ यांची साथ खूप लक्षणीय आहे. नुकताच डगलस एम्हॉफ यांनी त्यांच्या लव स्टोरीचा खुलासा केला आहे.

एम्हॉफने सांगितले की त्यांना पहिल्या नजरेत कमलाशी प्रेम झाले, त्यांना त्यावेळेसच वाटलं होतं की मी असा पहिला व्यक्ती असेल, जी राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीचा पती असेल. 56 वर्षीय अमहॉफने जीक्यू नावाच्या मासिकाच्या संपादकीयवर या गोष्टी लिहिल्या आहेत आणि कमला हॅरिसबद्दल अभिमान व्यक्त करताना त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.त्यांनी मतदान अभियानात कमला हॅरिस बरोबर उपस्थित राहणे हा सुखद अनुभव सांगितला आहे.

पहिल्या नजरेत झालं होत प्रेम

एम्हॉफने यांनी सांगितले आहे की, ‘जेव्हा मी कमलाला भेटलो तेव्हा मला माहित झाले की मी प्रेमात पडलो आहे. ती केवळ एक मृदू स्वभावाची, मजेदार आणि दयाळू स्त्री आहे, जी आमच्या कुटुंबाचा आधार आहे, तर तिच्या संकल्पनेमुळेच, ज्याद्वारे ती तिच्यावर विश्वास ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी झगडते.’डगलस एम्हॉफ आणि कमला हॅरिस ह्यांची पहिली भेट 2013 मध्ये ब्लाइंड डेटवर झाली होती. हॅरिस त्यावेळी कॅलिफोर्नियाची अटर्नी जनरल होती आणि डगलस लॉस एंजेलिसमधील मोठा मनोरंजन वकील होता.

2014 मध्ये झालं होत लग्न

दोघांनी 2014 मध्ये लग्न केलं. डगलस एम्हॉफला पहिल्या पत्नीकडून 2 मुले पण आहेत, ज्यांच नाव कोल आणि एला आहे. हे सगळे ब्लेअर हाऊस मध्ये राहत आहेत, जे व्हाइट हाऊसच्या बाजूला सरकारी निवास आहे. कारण अद्याप त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. जेव्हा अध्यक्ष जो बाइडेन यांच्या ऑफरवर हॅरिसने या मोहिमेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा एम्हॉफने आपल्या नोकरीपासून सुट्टी घेतली आणि त्यांच्याबरोबर निवडणूक प्रचारामध्ये सामील झाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments