आपलं शहरफेमस

“अपने तो अपने होते है” पंड्याने व्हिडिओतून दिला वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा…

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या त्याच्या वडिलांना खूपच मिस करत आहे. 16 जानेवारी रोजी हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांचे वडील हिमांशू पंड्या यांनी या जगाचा निरोप घेतला.

त्यानिमित्ताने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत हार्दिक पंड्याने आपल्या वडिलांची आठवण ताजी केली आहे. या व्हिडिओमधून हार्दिकने आपल्या वडिलांसोबतचे काही सुवर्ण क्षण शेअर केले आहेत.

व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये “अपने तो अपने होते हैं” हे गाणं प्ले होत आहे.

या व्हिडिओमध्ये हार्दिकचे वडील हिमांशु पंड्या, बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची भेट घेत आहेत. अमिताभ यांनी हार्दिकच्या वडिलांना सांगितले की, “तुम्ही अशा लाडक्या मुलाला जन्म दिला आहे, जो संपूर्ण जगात भारताचा झेंडा अभिमानाने फडकवत आहे.” त आठवण हार्दिकने शेअर केली आहे.

हा व्हिडिओ काही मिनिटांतच व्हायरल झाला असून आतापर्यंत 1.6 दशलक्ष लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच, यावर 11,000 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. हार्दिकच्या लाखो चाहत्यांनीदेखील त्याच्या दु:खामध्ये सहभाग नोंदवला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments