खूप काही

भारताकडून मिळालेल्या पराभवानंतर टीम ऑस्ट्रेलियात मोठे बदल

2018 मध्ये झालेल्या सँडपेपर गेट स्कँडल (Ball Tampering) नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाची टीम दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया ने बुधवारी, दक्षिण आफ्रिकेच्या विरूद्ध होणार्या कसोटी मालिकेसाठी आपला संघ घोषित केला आहे.
भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेत हार पत्करावी लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. (Australia to play its first test in South Africa after the ball tampering incident)

मैथ्यू वेड ला टीम मध्ये जागा नाही..
ऑस्ट्रेलियाचा मिडल ऑर्डर बल्लेबाज मॅथ्यू वेड (Matthew Wade) ह्याला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतील टीममध्ये जागा दिली गेली नाही. भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेत निराशाजनक कामगीरी केल्यामुळे त्याला टीम मधून ड्रॉप करण्यात आलं आहे.

वेड ने भारताविरूद्ध खेळलेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये केवळ एक अर्धशतक झळकावलं होतं.

तर सध्या चालू असलेल्या बीग बॅश लीग (BBL – Big Bash League) मधील जबरदस्त कामगिरी मुळे ॲलेक्स कॅरी (Alex Carey) ह्याला टीममध्ये संधी मिळाली आहे. कॅरीने आतापर्यंत बीबीएल मध्ये खेळलेल्या 11 सामन्यांत 400 हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक जबरदस्त शतक देखील त्याने झळकवले आहे.

बॉल टँपरींग घटनेनंतर पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत खेळणार कांगारू
2018 मधील बॉल टँपरींग (Ball Tampering) प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळत आहे. 2018 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळत होता त्यावेळेस एका सामन्यात ऑस्ट्रेलियाचे तीन प्रमुख खेळाडू- स्टीव स्मिथ (Steve Smith), डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि कॅमरन बँक्रॉफ्ट (Cameron Bancroft) बॉल टँपरींग मध्ये दोषी आढळले होते. या घटनेनंतर त्यांना तात्काळ निलंबित देखील केलं गेलं होतं.

आता या घटनेनंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा संघ, दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळण्यासाठी येणार आहे. दरम्यान, या मालिकेकडे सर्वच देशांच्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

अशी असेल टीम ऑस्ट्रेलिया:
टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स, सीन एबॉट, ॲलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरिस, जॉश हेजलवूड, ट्रॅविस हेड, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, मोइसिस हॅनरिक्स, डेव्हिड वॉर्नर, नाथन लियॉन, माईकल नीसर, जेम्स पॅटिंसन, विल पुकोवस्की, मिचेल स्टार्क, मार्क स्टीकटी आणि मिचेल स्वॅपसन.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments